आता व्हॉट्सअॅपद्वारे क्रिप्टोकरन्सी पेमेंट सुरू, कंपनीची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 10:18 PM2021-12-09T22:18:39+5:302021-12-09T22:19:55+5:30
Cryptocurrency payment starts on WhatsApp : रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपचे सीईओ विल कॅथकार्ड (Will Cathcard) आणि नोव्हीचे सीईओ स्टीफन कॅसरिअल (Stephane Kasriel) यांनी संयुक्तपणे यासंदर्भात घोषणा केली.
नवी दिल्ली : व्हॉट्सअॅप पेमेंट सर्व्हिस (WhatsApp Payment Service)जगभरात अतिशय संथ गतीने सुरू होत असली तरी कंपनीने आज एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने म्हटले आहे की, व्हॉट्सअॅप पे (WhatsApp Pay) वापरून आता अमेरिकेतील लोक एकमेकांना क्रिप्टोकरन्सी सुद्धा ट्रान्सफर (Transfer cryptocurrency using WhatsApp) करू शकतील.
9to5mac.com च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपचे सीईओ विल कॅथकार्ड (Will Cathcard) आणि नोव्हीचे सीईओ स्टीफन कॅसरिअल (Stephane Kasriel) यांनी संयुक्तपणे यासंदर्भात घोषणा केली. दरम्यान, नोव्ही (Novi) हे मेटाचे (Meta) डिजिटल वॉलेट देखील आहे. व्हॉट्सअॅपने हे फीचर केवळ काही लोकांपर्यंत पोहोचवले आहे. म्हणजेच, ज्या लोकांपर्यंत हे फीचर पोहोचले आहे, ते या मेसेंजर अॅपद्वारे पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकतील.
नोवीच्या वेब पेजनुसार, ही सर्व्हिस पैसे पाठवण्याचा आणि प्राप्त करण्याचा एक नवीन मार्ग आहे आणि त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. हे युजर्सला 'व्हॉट्सअॅप चॅट न सोडता' पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देते. दरम्यान, आता मेटा असलेल्या फेसबुकने (Facebook) व्हॉट्सअॅपद्वारे क्रिप्टोकरन्सी (cryptocurrency) पेमेंट करण्याच्या योजनेचा खुलासा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2018 च्या एका रिपोर्टमध्ये Bloomberg ने म्हटले होते की, कंपनी एका 'stablecoin'वर काम करत आहे.
याचबरोबर, तज्ज्ञांनी सांगितले की, कंपनी एक स्टेबलकॉइन (stablecoin) विकसित करत आहे. हे एक प्रकारचे डिजिटल चलन असेल, जे यूएस डॉलरसोबत जोडले जाईल आणि खूपच कमी व्होलॅटिलिटी (volatility) असेल. दरम्यान, हे लोक कंपनीच्या अंतर्गत योजनेवर चर्चा करण्यासाठी अधिकृत नाही आहेत. मात्र, आता तीन वर्षांनंतर लोकांना क्रिप्टोकरन्सी वापरून पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देण्यासाठी व्हॉट्सअॅपने नोव्हीसोबत भागीदारी केली आहे. अमेरिकेशिवाय गुएटेमाला (Guatemala) याठिकाणी सुद्धा या सर्व्हिसची टेस्टिंग घेतली जात आहे.