पैगंबर प्रकरणी भारतावर सायबर हल्ला; सरकारी संकेतस्थळ हॅकर्सच्या निशाण्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 11:32 PM2022-06-10T23:32:59+5:302022-06-10T23:33:09+5:30
ड्रॅगन फोर्स मलेशियानं जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी असलेली बार्टी संस्थेचे संकेतस्थळ हॅक केले आहे
औरंगाबाद - पैगंबर मोहम्मद यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्याचे पडसाद जगभरासह आता भारतातही उमटू लागले आहेत. शुक्रवारची नमाज अदा करून देशभरात विविध ठिकाणी मुस्लीम समाज रस्त्यावर उतरला होता. काही ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या. आता ड्रॅगन फोर्स मलेशिया नावाच्या हॅकर्सनं भारतीय संकेतस्थळावर सायबर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे.
ड्रॅगन फोर्स मलेशियानं जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी असलेली बार्टी संस्थेचे संकेतस्थळ हॅक केले आहे. तसेच इस्त्राईल एम्बेसी आणि काही सरकारी वेबसाईट हॅक झाल्याचं सांगण्यात येत आहे. या वेबसाईटवर कुराण ऐकायला येत असून भारताला इशारा देण्यात आला आहे. या मेसेजमध्ये म्हटलंय की, तुम्ही आमच्या मशिदीवर, घरांवर, मदरशावर हल्ले कराल, जाळाल परंतु आमची ऊर्जा मारू शकत नाही. पैंगबर मोहम्मद यांचा अपमानाचा बदला आम्ही घेणार आहोत. तुमच्या माफीला काहीच अर्थ नाही असं म्हटलं आहे.
या वेबसाईट टार्गेटवर
https://indembassyisrael.gov.in/
https://bartievalidity.maharashtra.gov.in/index.php