तुम्हीही ऑनलाईन औषधं मागवता?, 'या' गोष्टी ठेवा लक्षात; गृह मंत्रालयाच्या Cyber Dost ने केलं अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 06:48 PM2022-02-08T18:48:25+5:302022-02-08T18:56:34+5:30

Cyber Dost Alert : ऑनलाईन पद्धतीने खरेदी करताना एखाद्या वस्तूसाठी चांगले डिस्काउंट-ऑफर्स दिल्या जातात. परंतु स्वस्त दरात खरेदी करण्याच्या नादात तुम्ही फेक वस्तू खरेदी करत तर नाही ना? याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

cyber dost alert to keep important things in mind before you order your medicine online | तुम्हीही ऑनलाईन औषधं मागवता?, 'या' गोष्टी ठेवा लक्षात; गृह मंत्रालयाच्या Cyber Dost ने केलं अलर्ट

तुम्हीही ऑनलाईन औषधं मागवता?, 'या' गोष्टी ठेवा लक्षात; गृह मंत्रालयाच्या Cyber Dost ने केलं अलर्ट

googlenewsNext

नवी दिल्ली - सध्याचा जमाना हा डि़जिटलचा असल्याने बहुतेक गोष्टी या ऑनलाईनच केला जातात. अनेक गोष्टी ऑनलाईन उपलब्ध झाल्याने इतर ठिकाणी जाण्याचा वेळ वाचतो. पण ऑनलाईन शॉपिंग करताना अतिशय सतर्क राहणंही गरजेचं आहे. अन्यथा मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. ऑनलाईन पद्धतीने खरेदी करताना एखाद्या वस्तूसाठी चांगले डिस्काउंट-ऑफर्स दिल्या जातात. परंतु स्वस्त दरात खरेदी करण्याच्या नादात तुम्ही फेक वस्तू खरेदी करत तर नाही ना? याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून विषेशत: कोरोना काळापासून अनेक जण औषधं ऑनलाईन मागवतात. ज्यावर ग्राहकांना चांगला डिस्काउंट मिळतो. मात्र नुकतंच गृह मंत्रालयाने त्यांच्या सायबर दोस्त पोर्टलवरुन (Cyber Dost) लोकांना ऑनलाईन फ्रॉडपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. सायबर दोस्तने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती देत ऑनलाईन खोट्या औषधांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

'या' गोष्टी ठेवा लक्षात 

- ऑनलाईन औषधं मागवताना केवळ अधिकृत, विश्वासार्ह फार्मेसीतूनच औषधं मागवा. त्याशिवाय आधीच पेमेंट करण्याआधी कॅश ऑन डिलीव्हरीची निवड करा. यामुळे फ्रॉडपासून बचाव होण्यास मदत होऊ शकते.

- डिस्काउंट मिळवण्याच्या नादात अनेक जण कितीतरी प्रकारच्या आउटलेट्सद्वारे औषधं किंवा इतर वस्तू मागवतात. परंतु असं करणं धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे डिस्काउंटच्या जाळ्यात न अडकता केवळ विश्वासार्ह फार्मेसीद्वारेच औषधं ऑर्डर करा.

- सध्या ऑनलाईन औषधं मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत. ऑफलाईन औषधांच्या दुकानात 20 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळत असेल, तर ऑनलाइन 60 टक्क्यांपर्यंत मिळताना दिसतो. त्यामुळे लोक औषधं मोठ्या प्रमाणात ऑनलाईन ऑर्डर करतात. अशात फसवणुकीचेही अनेक प्रकार होतात. त्यामुळे ऑनलाईन औषधं मागवताना काळजी घेणं गरजेचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
 

Web Title: cyber dost alert to keep important things in mind before you order your medicine online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.