सिम कार्ड बंद, एक चूक अन् लाखो रुपयांचा गंडा; व्यापाऱ्यासोबत घडलं असं काही की खातं झालं रिकामं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 02:17 PM2023-01-11T14:17:42+5:302023-01-11T14:22:30+5:30
एका व्यापाऱ्याला तब्बल लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. एक चूक महागात पडली असून अकाऊंट रिकामं झालं आहे.
डुअल सिम कार्डचे फोन हे आजकाल ट्रेंडमध्ये आहेत. मोठ्या प्रमाणात लोक एकापेक्षा जास्त सिम कार्डचा वापर करतात. पण अनेकदा एक सिम कार्ड वापरत असताना दुसऱ्या सिम कार्डकडे लक्ष जात नाही. काही वेळा कंपन्या काही महिने गेल्यानंतर कार्ड बंद करतात. दिल्लीमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका व्यापाऱ्याला तब्बल लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.
दिल्लीतील ज्या व्यापाऱ्याला मोठा फटका बसला आहे. तो व्यापारी खूप वेळापासून आपलं सिम कार्ड वापरत नव्हता. एक चूक महागात पडली असून अकाऊंट रिकामं झालं आहे. तपासामध्ये व्यापाऱ्याचा जो नंबर रजिस्टर होतो. तो खूप काळापासून इनएक्टिव्ह असल्याचं समोर आलं आहे, टेलिकॉम कंपनीने तो नंबर दुसऱ्या एका युजरला अलॉट केला होता. त्यामुळे त्या व्यक्तीने ही फसवणूक केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
जर तुमचा देखील नंबर हा बँक अकाऊंटशी जोडलेला असेल आणि नंतर तो दुसऱ्याच्य नावाने अलॉट झाला असेल तर तुम्ही देखील ऑनलाईन फ्रॉडचे शिकार होऊ शकता. जर तुम्ही एखादं ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म वापरत असाल आणि नंतर तो नंबर बंद केलात. तर बंद करण्य़ाआधी एकदा रजिस्टर बँक अकाऊंटमधून देखील तो रिमूव्ह करा. नाहीतर बँकेचे मेसेज त्या नंबरवर येत राहतील आणि हॅकर्स तुम्हाला जाळ्यात अडकवू शकतात.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"