Smart TV: घरच्या घरी मिळवा थिएटरचा अनुभव; स्वदेशी कंपनी Daiwa नं लाँच केले दोन नवीन 4K Smart TV  

By सिद्धेश जाधव | Published: December 8, 2021 05:06 PM2021-12-08T17:06:04+5:302021-12-08T17:10:24+5:30

4K Smart TV Price In India: स्वदेशी Smart TV ब्रँड Daiwa नं 1.5GB RAM, WebOS TV, 4K Display आणि डॉल्बी ऑडिओ साऊंड टेक्नॉलॉजी असलेले दोन स्मार्ट टीव्ही मॉडेल सादर केले आहेत.

Daiwa launched new 4k ultra hd smart tv in india  | Smart TV: घरच्या घरी मिळवा थिएटरचा अनुभव; स्वदेशी कंपनी Daiwa नं लाँच केले दोन नवीन 4K Smart TV  

Smart TV: घरच्या घरी मिळवा थिएटरचा अनुभव; स्वदेशी कंपनी Daiwa नं लाँच केले दोन नवीन 4K Smart TV  

googlenewsNext

4K Smart TV price In India: स्वदेशी Smart TV ब्रँड Daiwa नं भारतात आपले दोन नवीन 4K UHD Smart TV लाँच केले आहेत. ज्यात 1.5GB RAM, WebOS TV, 4K Display आणि डॉल्बी ऑडिओ साऊंड टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. यातील 43 इंचाच्या मॉडेलची किंमत 34,999 रुपये आणि 55 इंचाच्या मॉडेलची किंमत 49,999 रुपये आहे. चला जाणून घेऊया या स्मार्ट टीव्हीचे स्पेसिफिकेशन्स.  

Daiwa 4K Smart TV चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

या स्मार्ट टीव्हीमध्ये 1.5जीबी रॅम आणि 8जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तर प्रोसेसिंगसाठी ARM CA55 1.1 Ghz क्वॉड-कोर प्रोसेसरची ताकद मिळते. हा टीव्ही webOS TV वर चालतो. दमदार साउंडसाठी दोन्ही मॉडेल्समध्ये 20 वॉटचे साउंड बॉक्स स्पिकर डॉल्बी ऑडियो साउंड टेक्नॉलजीसह देण्यात आले आहेत.  

96 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो असलेला हा टीव्ही बेजललेस डिजाईनसह सादर करण्यात आला आहे. दैवाच्या या नव्या टीव्हीमध्ये HDR 10 आणि HLG सपोर्ट देखील मिळतो, त्यामुळे शानदार पिक्चर क्वॉलिटी मिळते. यातील MEMC सपोर्ट आणि 4K 60Hz डिस्प्ले स्मूद व्हिज्युअल्स देतो. टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, यूट्यूब, डिज्नी+ हॉटस्टार आणि स्पॉटिफाय सारखे अनेक अ‍ॅप प्री लोडेड मिळतात. 

कनेक्टिविटीसाठी यात ड्यूल बँड वाय-फाय, मिराकास्ट आणि 2 वे ब्लूटूथ 5.0 मिळेल. या टीव्ही सोबत येणारा मॅजिक रिमोट यूनिवर्सल कंट्रोल फीचरसह येतो. ज्याच्या माध्यमातून टीव्हीशी कनेक्टेड सर्व डिवाइसेज देखील ऑपरेट करता येतील.  

Web Title: Daiwa launched new 4k ultra hd smart tv in india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.