ALERT! धोक्याची घंटा! तुमच्या परवानगीविना आपोआप इंस्टॉल होत आहेत काही अॅप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 05:11 PM2021-10-14T17:11:40+5:302021-10-14T17:11:58+5:30
Dangerous Android Apps: काही अँड्रॉइड अॅप्स युजर्सच्या कोणत्याही परवानगीविना फोनमध्ये इन्स्टॉल होत आहेत. हे अॅप्स जाहिरातींमधून Google Play च्या नकळत इन्स्टॉल केले जात आहेत.
धोकादायक अॅप्सच्या अनेक बातम्या अधून-मधून येत असतात. हे अॅप्स युजर्स स्वतःहून इन्स्टॉल करतात. परंतु आता अशा काही अँड्रॉइड अॅप्सची माहिती समोर आली आहे, जे कथितरित्या युजर्सच्या परवानगीविना स्मार्टफोनमध्ये डाउनलोड होत आहेत. Reddit वर अशा अनेक युजर्सनी अशा अॅप्सचा सामना केल्याची माहिती दिली आहे. यातील एक अँड्रॉइड अॅप गुगल प्ले स्टोरवर लिस्ट झाल्याचे देखील आढळले आहे.
हा अॅप परवानगीविना आपोआप होत आहे डाउनलोड
‘वेदर होम-लाईव्ह रडार अलर्ट अँड विजेट’ हा अॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे आणि ऑटोमॅटिक डाउनलोड होत आहे. रेडीटवर ज्या जाहिरातीमुळे अॅप डाउनलोड होत आहे त्यांचे काही स्क्रीनशॉट देखील देण्यात आले आहेत. जाहिरातीमधून ऑप्ट-आउट करून सुद्धा बॅकग्राउंडमध्ये अॅप डाउनलोड झाला आहे.
रेडिट पोस्टनुसार, ही टेक्नॉलॉजी डीएसपी डिजिटल टर्बाइनची आहे, ज्यांनी गुगल प्लेच्या नकळत अॅप इंस्टॉल करण्याची एक पद्धत शोधली आहे. अशा अॅप्स पासून सुरक्षित राहण्यासाठी अॅप्लिकेशन डाउनलोड करण्याआधी रिव्यूज वाचणे आवश्यक आहे. तसेच डेव्हलपरची माहिती मिळवावी आणि काही चुकीचे आढळल्यास गुगल प्ले ला ती माहिती रिपोर्ट करावी.