'हे' 13 Apps मोबाईलमध्ये असतील तर लगेच डिलीट करा; अन्यथा बँक खाते होईल रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 08:12 PM2022-08-02T20:12:35+5:302022-08-02T20:16:09+5:30

या धोक्यामुळे अनेक गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) अॅप्स धोकादायक घोषित करण्यात आले असून ते डाउनलोड केल्याने युजर्सचे बँक खातेही रिकामे होऊ शकते.

dangerous smartphone android apps stealing money delete immediately | 'हे' 13 Apps मोबाईलमध्ये असतील तर लगेच डिलीट करा; अन्यथा बँक खाते होईल रिकामे

'हे' 13 Apps मोबाईलमध्ये असतील तर लगेच डिलीट करा; अन्यथा बँक खाते होईल रिकामे

Next

नवी दिल्ली : आजच्या काळात स्मार्टफोन बहुधा प्रत्येकजण वापरत असेल आणि अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या फोनमध्ये अनेक अ‍ॅप्स देखील असतील. अधिकृत प्लॅटफॉर्मवरून डाउनलोड केलेले अ‍ॅप्सही काही वेळा हॅकर्सच्या रडारवर असतात. म्हणजेच हॅकर्स स्मार्टफोन अ‍ॅप्सला हॅकिंगचे साधन बनवतात आणि नंतर त्यांच्याकडून लोकांच्या स्मार्टफोन्समध्ये सहज अ‍ॅक्सेस केला जातो. 

आज आम्ही तुम्हाला अशाच काही धोकादायक स्मार्टफोन अ‍ॅप्सबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही कधीही डाउनलोड करू नये आणि जर तुम्ही डाउनलोड केले असेल तर तुम्ही ते लगेच डिलीट केले पाहिजे. तुमच्या माहितीसाठी, एक धोकादायक अँड्राईड मालवेअर थ्रेट व्हायरल झाला आहे, ज्यामुळे हजारो अँड्राईड स्मार्टफोन युजर्सना धोका आहे. या धोक्यामुळे अनेक गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) अ‍ॅप्स धोकादायक घोषित करण्यात आले असून ते डाउनलोड केल्याने युजर्सचे बँक खातेही रिकामे होऊ शकते.

हे अ‍ॅप्स लगेच डिलिट करा
13 अ‍ॅप्स आहेत, जे तुम्ही कधीही डाउनलोड करू नये आणि जर तुमच्या फोनमध्ये हे अ‍ॅप्स असतील तर ते लगेच डिलीट करा. यामध्ये Junk Cleaner, EasyCleaner, Power Doctor, Super Clean, Full Clean -Clean Cache, Fingertip Cleaner, Quick Cleaner, Keep Clean, Windy Clean, Carpet Clean, Cool Clean, Strong Clean आणि Meteor Clean हे अ‍ॅप्स आहेत.

अँड्राईड युजर्सना सल्ला
ज्या अँड्राईड युजर्सनी वरीलपैकी कोणतेही अ‍ॅप्स त्यांच्या फोनवर इन्स्टॉल केले आहेत, त्यांना सुरक्षित राहण्यासाठी ते लवकरात लवकर काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. तसेच अ‍ॅप अनइंस्टॉल केल्यानंतर तुमच्या सोशल मीडिया अकाउंटचा पासवर्ड सुद्धा बदला. त्यामुळे तुमच्या फोनमधील डेटा सुरक्षित राहील. 

Web Title: dangerous smartphone android apps stealing money delete immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.