इन्स्टाग्राम, टिकटॉक आणि युट्युबच्या 23.5 कोटी युजर्सचा डेटा लीक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 08:18 PM2020-08-21T20:18:06+5:302020-08-21T20:38:12+5:30
हा डेटा लीक झाल्याची माहिती सिक्योरिटी रिसर्च कंपनी कॉमपेरीटेकने दिली आहे.
नवी दिल्ली : जर तुम्ही इन्स्टाग्राम, टिकटॉक किंवा युट्युब वापरत असाल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. जगभरातील 23.5 कोटी इन्स्टाग्राम, युट्युब आणि टिकटॉक युजर्सची खासगी माहिती सार्वजनिक म्हणजेच लीक झाली आहे. हा डेटा लीक झाल्याची माहिती सिक्योरिटी रिसर्च कंपनी कॉमपेरीटेकने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 100 मिलियन इंस्टाग्राम युजर्सचा डेटा लीक झाला आहे, ज्यात युजर्सच्या प्रोफाइलबद्दल संपूर्ण माहिती आहे. तसेच, 42 मिलियन टिकटॉक युजर्सचा डेटा लीक झाला आहे, तर 4 मिलियन यूट्यूब युजर्सची वैयक्तिक माहिती धोक्यात आहे. लीक केलेल्या डेटामध्ये प्रोफाइल नाव, अकाऊंट डिस्क्रिप्शन, अकाऊंट इंगेजमेंट, फॉलोअर्सची संख्या, फॉलोअर्स ग्रोथ रेट, ऑडियंस एज, लोकेशन, लाइक्स यासारख्या माहितीचा समावेश आहे.
लीक करण्यात आलेला डेटा हॅकर्स आणि स्कॅमर्स कोणत्याही कारणासाठी वापरू शकतात. या माहितीचा वापर करून हॅकर्स तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतात. याशिवाय, तुमच्या नावाचा आणि प्रोफाइलचा गैरवापरही होऊ शकतो. दरम्यान, आतापर्यंत डेटा लीकच्या सोर्सबाबत अचूक माहिती मिळाली नाही. मात्र, पहिल्या दृष्टीक्षेपात, या डेटा लीकचे कारण अनसिक्योर डाटाबेस असल्याचे सांगितले जात आहे.
काही दिवसांपूर्वी भारतात यूपीआय डेटा लीकचा रिपोर्ट समोर आला होता. यूपीआय डेटा लीक देखील अनसिक्योर डाटाबेसमुळे झाला होता. इन्स्टाग्राम, युट्युब आणि टिकटॉकच्या युजर्संना डेटा लीक संदर्भात माहिती कॉमपेरिटेकच्या एका रिसर्चने एक ऑगस्टला दिली होती.
आणखी बातम्या...
आता सुलभ होणार चारधाम यात्रा! रेल कनेक्टिव्हिटवर काम सुरू, रेल्वेमंत्र्यांनी ट्विट केला खास व्हिडीओ
बलात्कार प्रकरणातील आरोपी नित्यानंदने उघडली बँक, उद्या चलन लाँच करणार
बलात्कार प्रकरणातील आरोपी नित्यानंदने उघडली बँक, उद्या चलन लाँच करणार
स्वदेशी कोरोना लसींबाबत खूशखबर; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले कधी मिळेल!
आता 1 रुपयात सोने खरेदी करू शकता, Amazon Pay चे नवे फीचर लाँच
१००० वर्षांहून अधिक काळ टिकणार अयोध्येतील राम मंदिर, संपूर्ण दगडाने बांधणार
आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेखाचे विषय 'असे' असतील; नितेश राणेंची खोचक टीका
मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना; गजेंद्रसिंह शेखावत यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह!
जिम पुन्हा सुरू करणे आवश्यक; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जम्मू-काश्मीरमधून १० हजार जवानांना माघारी बोलविणार
शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन