युझर्सच्या डेटावर मोठं संकट; Telegram अ‍ॅप हॅकर्सच्या रडारवर

By जयदीप दाभोळकर | Published: January 26, 2021 11:18 AM2021-01-26T11:18:22+5:302021-01-26T11:22:16+5:30

फेसबुक युझर्सचे डिटेल्स अ‍ॅक्सेस करत असल्याची माहिती समोर

Data of 533 million Facebook users being sold via Telegram bot says Report social media | युझर्सच्या डेटावर मोठं संकट; Telegram अ‍ॅप हॅकर्सच्या रडारवर

युझर्सच्या डेटावर मोठं संकट; Telegram अ‍ॅप हॅकर्सच्या रडारवर

Next
ठळक मुद्देफेसबुक युझर्सचे डिटेल्स अ‍ॅक्सेस करत असल्याची माहिती समोर २०१९ पूर्वीच्या फेसबुक अकाऊंट्सना सर्वाधिक धोका

इंटरनेट युझर्सच्या डेटावर असलेली हॅकर्सची नजर किंवा तो डेटा चोरला जाणं अशा घटना सातत्यानं घडत आहेत. दरम्यान, आता हॅकर्सनं आपली नजर Telegram या अ‍ॅपकडे वळवली आहे. काही वृत्तांनुसार हॅकर्स टेलिग्राम अ‍ॅप च्या बॉटचा वापर करून फेसबुक युझर्सचे डिटेल्स अ‍ॅक्सेस करत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अशा युझर्सना टार्गेट केलं जात आहे, ज्यांचा डेटा दोन वर्षांपूर्वी झालेल्या ब्रीच हॅकर्सच्या हाती लागला होता.

२०१९ मध्ये एका रिसर्चरनं एका अनसिक्यॉर्ड सर्व्हरची ओळख पटवली होती. या सर्व्हरवर जवळपास ४२ कोटी रेकॉर्ड्स उपलब्ध होते. यामध्ये अमेरिका आणि ब्रिटमधील १५ कोटी युझर्सचा डेटाही होता. यासाठी हॅकर्सनं टेलिग्राम अ‍ॅपच्या बॉटचा वापर केला होता. सहजरित्या फेसबुक युझर्सच्या कॉन्टॅक्ट डिटेल्सपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी टेलिग्राम बॉटचा वापर केला होता. 

रिव्हर्स सर्च ट्रिकचा खेळ

रिपोर्ट्समधअये सांगितल्याप्रमाणे हा बॉट युझर्सना फेसबुक आयडीच्या ऐवजी त्यांचा फोन नंबर एन्टर करण्यास सांगतो. ज्याची माहिती हॅकर्सना हवी असते. याव्यतिरिक्त हा बॉट रिव्हर्स सर्च या ट्रिकच्या मदतीनं फेसबुक आयडीद्वारे युझर्सचे नंबर्स अ‍ॅक्सेस करतात. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार यात ४० कोटी पेक्षा अधिक युझर्सचा डेटा असुक्षित डेटाबेसचा भाग बनला आहे. 

१९ देशांच्या युझर्सचा डेटा

हा बॉट १९ देशांच्या युझर्सचा डेटा अ‍ॅक्सेस करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. जे लोकं आपला क्रमांक प्रायव्हेट ठेवतात त्या युझर्सचा डेटा या बॉटला अ‍ॅक्सेस करणं शक्य नसल्याचं एका चाचणीतून समोर आलं आहे. जे फेसबुक अकाऊंट्स डेटा लीकचं संकट संपल्यानंतर तयार केलेत अशा अशा अकाऊंट्सना कोणताही धोका नसल्याची माहिती समोर आली आहे. जे अकाऊंट्स २०१९ नंतर तयार करण्यात आले आहेत त्यांच्याबाबत मात्र कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अशातच हे अकाऊंट्स हॅकर्सच्या टार्गेटवर आहेत. कारण असे अकाऊंट्स सहजरित्या टेलिग्रामद्वारे अ‍ॅक्सेस करता येऊ शकतात. 
 

Web Title: Data of 533 million Facebook users being sold via Telegram bot says Report social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.