बापरे! तब्बल 70 कोटी Linkedin युजर्सच्या डेटाची चोरी? पगारासह खाजगी माहिती पुन्हा लीक 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 02:48 PM2021-06-30T14:48:31+5:302021-06-30T14:52:15+5:30

Linkedin Data Breach 2021: LinkedIn युजर्सची खाजगी माहिती पुन्हा एकदा लीक झाली आहे. जवळपास 92 टक्के लिंक्डइन युजर्सच्या लीक झालेल्या डेटामध्ये त्याच्या पगाराची माहिती देखील आहे.  

data of over 700 million linkedin users listed online for sale report  | बापरे! तब्बल 70 कोटी Linkedin युजर्सच्या डेटाची चोरी? पगारासह खाजगी माहिती पुन्हा लीक 

बापरे! तब्बल 70 कोटी Linkedin युजर्सच्या डेटाची चोरी? पगारासह खाजगी माहिती पुन्हा लीक 

googlenewsNext

यावर्षी एप्रिलमध्ये सोशल नेटवर्किंग साइट LinkedIn वरील 50 कोटी युजर्सचा डेटा लीक झाला होता. आता पुन्हा एकदा या साईटचा डेटा लीक झाल्याची बातमी आली आहे. लिंक्डइनच्या 75.6 कोटी युजर्सपैकी 70 कोटी युजर्सचा डेटा लीक झाल्याची बातमी आली आहे. एकूण युजर्सपैकी 92 टक्के युजर्सच्या फोन नंबरसह पगार व खाजगी माहिती देखील लीक झाली आहे.  (LinkedIn breach expose data of 700 million users, including number, address and salary details)

ऑनलाइन हॅकर्स फॉरमवर एका हॅकरने Linkedin च्या 70 कोटी युजर्सच्या डेटा विक्रीसाठी जाहिरात दिली आहे, अशी माहिती RestorePrivacy या वेबसाईटने दिली आहे. RestorePrivacy प्रायव्हसी आणि डेटा सिक्योरिटी संबंधित बातम्या देणारी वेबसाईट आहे. रिपोर्ट्सनुसार, या हॅकरने लीक झालेल्या डेटाचा एक सॅम्पल देखील पोस्ट केला आहे. या सॅम्पलमध्ये 10 कोटी लिंक्डइन युजर्सची माहिती आहे. 

RestorePrivacy च्या तपासणीत डेटा सॅम्पल खरा असल्याचे आढळून आले आहे. वेबसाईटने सांगितले कि हा डेटा खऱ्या युजर्सचा आहे. यात संपूर्ण नाव, लिंक्डइन युजरनेम आणि URL, ईमेल, फोन नंबर, पत्ता, लिंग, खाजगी आणि व्यावसायिक अनुभव, अंदाजे पगार आणि इतर सोशल मीडिया अकॉउंट्सची माहिती देण्यात आली आहे.  

लिंक्डइनने मात्र लीक कोणताही डेटा ब्रीच न झाल्याचा दावा आपल्या वेबसाईटवर केला आहे. कंपनीने कथित डेटा तपासला असून त्यात कोणत्याही लिंक्डइन मेम्बरची खाजगी माहिती लीक झाली नाही, असे देखील कंपनीने सांगितले आहे.  

Web Title: data of over 700 million linkedin users listed online for sale report 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.