Data: तुमच्या डेटाला पाय फुटू नये म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 11:48 AM2023-11-26T11:48:45+5:302023-11-26T11:50:31+5:30

Data protect: आजच्या युगात डेटा हे नवीन इंधन म्हणून ओळखले जाते. त्यामुळे डेटा प्रायव्हसीबाबत कंपन्या संवेदनशील असतात. त्यामानाने ग्राहक मात्र तितकासा जागरूक नसतो; परंतु, अलीकडच्या काळात डेटाच्या सुरक्षेबाबत जागरूकता वाढू लागली आहे. आपला डेटा सुरक्षित राहावा, यासाठी काय करता येईल?

Data: To protect your data... | Data: तुमच्या डेटाला पाय फुटू नये म्हणून...

Data: तुमच्या डेटाला पाय फुटू नये म्हणून...


- ॲड. (डॉ.) प्रशांत माळी
(सायबरतज्ज्ञ वकील) 

डेटा हा आजच्या युगातील ही खूप मोठी संपत्ती आहे व त्याचा वापर हा विविध क्षेत्रांत केला जातो. जसे की, राजनैतिक निवडणूक जिंकण्यासाठी किंवा तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी.  तुमचा डेटा हा खूप सहजरीत्या लीक होऊ शकतो. डेटा लीक म्हणजे संवेदनशील डेटा योगायोगाने किंवा जाणूनबुजून भौतिकरीत्या, इंटरनेटवर किंवा कोणत्याही इतर स्वरूपात उघड होणे. 

जसे की हरवलेले हार्ड ड्राइव्ह किंवा लॅपटॉप, या संवेदनशील डेटामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, जसे की तुमचे नाव, पत्ता, फोन नंबर, ईमेल आयडी, पासवर्ड, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड नंबर, बँक अकाऊंट नंबर इत्यादी माहिती तुमच्या परवानगीशिवाय इतर व्यक्तींच्या हाती जाऊ शकते. या सगळ्या डेटाच्या डेटावरून एक नवीन डेटा बनवला जातो. ॲडटेक कंपन्या या डेटाचा वापर करून तुमच्या आवडीच्या अशा विविध गोष्टी तुम्हाला दाखवायला लागते.  तुमच्या मनातले इंटरनेटने ओळखले व लगेच तेच समोर दिसले  असे तुम्हाला वाटते. तुमच्या मनातील गोष्टीत इंटरनेटवर दिसत असतात  हा योगायोग नसून, तुमच्या डेटापासूनच बनवलेला नवीन डेटा असतो जो तुमच्या आचार-विचार तुमच्या आवडीनिवडी यांवर ताबा करत असतो. 

अनेक प्रकारे डेटा लीक 
कळत म्हणजे जे तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट किंवा फोटो अपलोड करता, फेसबुक किंवा इन्स्टाग्राम व इतर सोशल मीडियावर पोस्ट करून किंवा नवीन ॲप डाउनलोड केल्यावर ‘आय अग्री’ बटण प्रेस करता, गुगल सर्च वरून तुमचा शोधण्याचा पॅटर्न  बघितला जातो.  तुमचे गुगलचे लोकेशन ऑन  असते, किंवा तुमचा डेटा बँकमधून लीक झाला, झोमॅटोसारख्या कंपनीचा डेटा लीक झाला असेल तर तेथून तुमचा पण डेटा लीक होऊ शकतो.  

माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी हे करा
-  तुमचा पासवर्ड दुर्बल असू नयेत आणि तुमचे पासवर्ड एकाच वेळी अनेक ठिकाणी वापरणे टाळा.
- फिशिंग घोटाळ्यांमध्ये फसणे टाळा. ईमेल किंवा एसएमएसद्वारे येणाऱ्या लिंक्सवर क्लिक करू नका आणि तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही शेअर करू नका.
- सार्वजनिक वायफाय नेटवर्क वापरताना VPN वापरा.
- तुमच्या डिव्हाइसवर एक चांगला अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर स्थापित करा आणि नियमितपणे अपडेट करा.

माहितीचा डेटा लीक झाल्यास हे करा
- तुमच्या बँक आणि क्रेडिट कार्ड कंपनींशी संपर्क साधा आणि तुमच्या अकाऊंट्सची सुरक्षा तपासा.
- तुमच्या सोशल मीडिया अकाऊंट्स आणि ऑनलाइन खरेदी खात्यांचे पासवर्ड बदला.
-तुमच्या वैयक्तिक माहितीची निगराणी ठेवण्यासाठी एक आयडेंटिटी थेफ्ट प्रोटेक्शन सेवा वापरा.
- डेटा लीक एक गंभीर समस्या आहे, परंतु तुम्ही काही सावधगिरी बाळगून वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवू शकता.
-तुमचा डेटा लीक झाल्यास तुमच्याकडे दिवाणी व फौजदारी अशा दोन प्रकारे गुन्हा नोंदवायचे पर्याय आहेत.

Web Title: Data: To protect your data...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.