डेटा, अनलिमिटेड कॉलिंग..; Vodafone-Idea च्या प्लॅनमध्ये मिळेल 180 दिवसांची व्हॅलिडिटी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 08:13 PM2024-09-27T20:13:34+5:302024-09-27T20:14:33+5:30

तुम्ही vi चे ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे.

Data, Unlimited Calling..; Vodafone-Idea plan will get 180 days validity | डेटा, अनलिमिटेड कॉलिंग..; Vodafone-Idea च्या प्लॅनमध्ये मिळेल 180 दिवसांची व्हॅलिडिटी

डेटा, अनलिमिटेड कॉलिंग..; Vodafone-Idea च्या प्लॅनमध्ये मिळेल 180 दिवसांची व्हॅलिडिटी

Vodafone Idea : व्होडाफोन आयडिया, म्हणजेच vi ही देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. Vi चे देशभरात 21 कोटी ग्राहक आहेत. दरम्यान, कंपनीने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे प्लॅन ऑफर करत आहे. Vi च्या यादीमध्ये अल्पकालीन आणि दीर्घकालीन अनेक योजना आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यात दीर्घ वैधता मिळते.

गेल्या काही काळापासून टेलिकॉम कंपन्यांमध्ये प्रचंड स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक कंपनी आपल्या ग्राहकांना टिकवण्यासाठी आणि इतर कंपन्यांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे प्लॅन्स आणत आहेत. काही प्लॅन्समध्ये जास्त डेटा मिळतो, तर काही प्लॅन्समध्ये दीर्घ वैधता मिळते. Vi नेही आपल्या ग्राहकांसाठी अशेच प्लॅन्स आणले आहेत. या प्लॅनमध्ये तुम्हाला फ्री कॉलिंग आणि डेटासह 6 महिन्यांची व्हॅलिडिटी मिळते. 

Vi चा रु 1049 चा प्लॅन
Vodafone Idea आपल्या ग्राहकांना 1049 रुपयांचा प्लॅन ऑफर करते. या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना 180 दिवसांची वैधता मिळते. म्हणजे तुम्ही 6 महिन्यांसाठी रिचार्जच्या चिंतेतून मूक्त व्हाल. या प्लॅनमध्ये तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर 6 महिन्यांसाठी अमर्यादित मोफत कॉलिंग करू शकता. यासह, तुम्हाला एकूण 1800 एसएमएस मिळतात. पण, या प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त 12GB डेटा मिळतो. म्हणजे तुम्ही दर महिन्याला फक्त 2GB डेटा वापरू शकाल. फक्त कॉलिंग करणाऱ्यांसाठी हा प्लॅन उत्तम आहे. 

Vi चा Rs 1749 चा प्लॅन
Vodafone Idea ने आपल्या ग्राहकांसाठी 1749 रुपयांचा प्लॅनदेखील आणला आहे. या रिचार्ज प्लॅनमध्येही ग्राहकांना 180 दिवसांची वैधता मिळते. तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5GB डेटा मिळतो. Vi या प्लॅनसह Binge All Night ऑफर देखील देते. म्हणजे, तुम्ही रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अमर्यादित डेटा वापरू शकता.

Web Title: Data, Unlimited Calling..; Vodafone-Idea plan will get 180 days validity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.