तातडीने डिलीट करा ८ 'डेंजर' ॲप्स; ३० लाखांहून अधिक लोकांनी केलंय डाउनलोड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 08:23 AM2022-07-20T08:23:01+5:302022-07-20T08:23:29+5:30
अँड्रॉइड स्मार्टफोन वारणाऱ्यांना ८ धोकादायक ॲप्स तातडीने डिलीट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क । नवी दिल्ली :
अँड्रॉइड स्मार्टफोन वारणाऱ्यांना ८ धोकादायक ॲप्स तातडीने डिलीट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुगलनेही हे ८ ॲप्स प्ले स्टॉअरवरून हटवले आहेत. आतापर्यंत ३० लाखांहून अधिक लोकांनी हे ॲप डाउनलोड केले आहेत.
मालवेअर 'ऑटोलिकोस'
फ्रेंच सुरक्षा संशोधक मॅक्सिम इंग्राओ यांनी सर्वप्रथम ८ धोकादायक ॲप्सची सूचना दिली. या ॲप्समध्ये नवीन प्रकारचा मालवेअर लपलेला आहे. त्यांनी या मालवेअरला 'ऑटोलिकोस' असे नाव दिले आहे.
प्ले स्टोअरवरून हटवले असले तरी...
गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले असले तरी, हे ॲप्स डाउनलोड केलेल्या युजर्सच्या स्मार्टफोनवर अजूनही असतील. तसेच, ॲप्सच्या एपीके आवृत्त्या अजूनही गुगलवर उपलब्ध आहेत.
धोका काय?
हे ॲप्स वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय स्मार्टफोनमधील प्रीमियम सेवेचे सदस्यत्व घेतात. तसेच, एसएमएस वाचण्यासाठी परवानगी मागतात, त्यानंतर ते ओटीपीसारख्या गोष्टी चोरून यूजरचे पैसे लुटतात. या मालवेअर ॲप्सचा प्रचार करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी अनेक फेक फेसबुक पेजेस तयार केले आणि फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही जाहिराती चालवल्या.
१०लाख - व्लॉग स्टार व्हिडिओ एडिटर
१०लाख - क्रिएटिव्ह ३डी लाँचर
५लाख - फनी कॅमेरा
१लाख - वाव ब्यूटी कॅमेरा
१लाख - जीआयएफ इमोजी कीबोर्ड
१०,००० - रेझर कीबोर्ड आणि थीम
५,००० - फ्रीग्लो कॅमेरा १.०.०
१,००० - कोको कॅमेरा व्ही १.१