फोनमधून ताबडतोब डिलीट करा हे 4 अ‍ॅप्स! उशीर केला तर बसेल मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 11:30 PM2022-11-03T23:30:32+5:302022-11-03T23:36:03+5:30

यांपैकी कुठलेही अ‍ॅप आपल्या फोनमध्ये असेल तर ते त्वरित डिलीट करायला हवे...

Delete these 4 apps from your smartphone immediately | फोनमधून ताबडतोब डिलीट करा हे 4 अ‍ॅप्स! उशीर केला तर बसेल मोठा फटका

संग्रहित छायाचित्र.

googlenewsNext

लोक आपल्या स्मार्टफोनवर सातत्याने अ‍ॅप्स डाउनलोड करत असतात. आणि त्यांचे काम झाले की ते डिलिटही करत असतात. पण , असेही काही अ‍ॅप्स आहेत, जे काही तास अथवा काही दिवस ठेवल तरी तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. महत्वाचे म्हणजे, अशा अ‍ॅप्समुळे तुमचे बँक खाते आणि तुमचे सोशल मीडिया खाते हॅक देखील होऊ शकते. आज आम्ही आपल्याला अशाच काही अ‍ॅप्ससंदर्भात सांगणार आहोत, जे आपण लगेचच आपल्या फोनमधून डिलीट करायला हवीत अन्यथा आपली वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते.

कोणते आहेत हे अ‍ॅप्स -
जर आपल्याला, आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतील, अशा अ‍ॅप्सबद्दल अद्यापही माहिती नसेल, तर आज आम्ही आपल्याला त्यांसंदर्भात माहिती देत आहोत. यासंदर्भात माहिती मिळताच आपण ताबडतोब स्मार्टफोनमधून ते अ‍ॅप्स डिलीट करा. या अ‍ॅप्समुळे तुमच्या अतिशय महत्वाच्या माहितीची सुरक्षितता धोक्यात येईल. आम्ही ज्या धोकादायक अ‍ॅप्ससंदर्भात बोलत आहोत. त्यांत, Bluetooth auto connect, Bluetooth app sender, driver: Bluetooth, Wi-Fi, USB आणि शेवटचे अ‍ॅप म्हणजे, mobile transfer: smart switch. 

आम्ही आपल्याला ज्या अ‍ॅप्ससंदर्भात माहिती दिली आहे, ते आधी डिलीट करा. कारण हे चार अ‍ॅप्स अत्यंत धोकादायक आहेत. जर आपण या अ‍ॅप्सचा इतिहास बघितलात तर, आपल्याला यात अनेक छुपे अ‍ॅप्स बघायला मिळतील. यामुळे युजर्सना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. महत्वाचे म्हणजे,  मालवेअर युजर्सची वैयक्तिक माहिती विकतात आणि त्याद्वारे पैसे कमावतात, यामुळे यांपैकी कुठलेही अ‍ॅप आपल्या फोनमध्ये असेल तर ते त्वरित डिलीट करायला हवे.

Web Title: Delete these 4 apps from your smartphone immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.