Shraddha Murder Case : Instagram ID पासून ते धर्मापर्यंत...; श्रद्धा अन् आफताबबद्दल गुगलवर काय-काय सर्च केलं जातंय पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 12:01 PM2022-11-17T12:01:28+5:302022-11-17T12:13:55+5:30
Shraddha Murder Case : श्रद्धा हत्या प्रकरणाची सध्या देशभरात मोठी चर्चा होत आहे. लोक गुगलवरही या हत्याकांडासंदर्भातील अनेक गोष्टी सर्च करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देशभर हादरला आहे. या घटनेतील मुख्य आरोपी आणि श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताबने आपला गुन्हा कबूल केला आहे. गळा आवळून आफताबने श्रद्धची हत्या केली. त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवले. 300 लीटर क्षमतेचा फ्रिज विकत घेतला होता. तो रोज एक-दोन तुकडे जंगलामध्ये फेकून त्याची विल्हेवाट लावत होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
श्रद्धा हत्या प्रकरणाची सध्या देशभरात मोठी चर्चा होत आहे. लोक गुगलवरही या हत्याकांडासंदर्भातील अनेक गोष्टी सर्च करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आफताबच्या इन्स्टाग्राम अकाऊंटपासून ते त्याचा धर्म कोणता आहे हे लोक सर्च करत असल्याचं पाहायला मिळत आहे. गुगलवर हा विषय टॉप ट्रेंड सर्चमध्ये देखील आहे. तसेच Dexter या वेब सिरीजसंदर्भातील सर्चही मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून आलं आहे.
निर्दयी! श्रद्धाचे 35 तुकडे करणारा 'तो' शांतपणे झोपला; आफताबचा जेलमधील Video व्हायरल
आफताबने या अमेरिकी क्राइम वेबसिरीजमुळे कल्पना सुचल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे गुगल ट्रेंडमध्येही डेक्सटर टॉप सर्च टॉपिकमध्ये दिसून येत आहे. सध्या अनेकजण श्रद्धा वालकर फेसबुक असंही मोठ्या प्रमाणात सर्च करत आहेत. आफताब नेमका कोणत्या धर्माचा आहे यासंदर्भातही भारतीयांना उत्सुकता आहे. गुगलवरुन श्रद्धाचं इन्स्टाग्राम हँडल शोधणाऱ्यांचं प्रमाणही जास्त आहे. गुगल सर्च ट्रॅफिक ग्राफप्रमाणे श्रद्धाचं इन्स्टाग्राम अकाऊंट गुगलवरुन सर्च करणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आहे.
"आफताब रात्री अचानक पाण्याचा पंप सुरू करायचा कारण...."; शेजाऱ्यांचा धक्कादायक खुलासा
गुगल ट्रेंडमध्ये लोक नेमकं काय शोधत आहेत याबद्दलची माहिती मिळते. गुगलकडूनच यासंदर्भातील सुविधा देण्यात आली आहे. मात्र यामधून नेमकी आकडेवारी समोर येत नाही. असं असलं तरी कोणत्या विषयांबद्दल इंटरनेटवर चर्चा सुरू आहे, ते समजतं. गुगलवरील सर्च टॉपिक्समध्ये डेटींग, लव्ह-जिहाद, डेक्टरस टीव्ही सिरीज यासारख्या विषयांचा समावेश आहे. तसेच दिल्ली मर्डर हा शब्दही मोठ्या प्रमाणात शोधला जात आहे. या विषयाशी संबंधित लिंक्स आणि बातम्या शोधण्याचं प्रमाण 450 टक्क्यांनी वाढलं आहे. श्रद्धा मर्डर केस हा सर्वाधिक सर्च केलेला विषय आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"