Dell ने लाँच केले 2 भन्नाट गेमिंग लॅपटॉप, इंटेल प्रोसेसरसह मिळतोय 8GB RAM  

By सिद्धेश जाधव | Published: May 17, 2022 09:59 AM2022-05-17T09:59:00+5:302022-05-17T09:59:33+5:30

Dell नं भारतात 2 नवीन गेमिंग लॅपटॉप लाँच केले आहेत. ज्यात 12th Gen Intel Core प्रोसेसरसह हाय रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले मिळतो.  

Dell G15 5520 And G15 5521 Special Edition SE Launched In India   | Dell ने लाँच केले 2 भन्नाट गेमिंग लॅपटॉप, इंटेल प्रोसेसरसह मिळतोय 8GB RAM  

Dell ने लाँच केले 2 भन्नाट गेमिंग लॅपटॉप, इंटेल प्रोसेसरसह मिळतोय 8GB RAM  

Next

Dell ने भारतात 2 नवीन गेमिंग लॅपटॉप Dell G15 5520 आणि Dell G15 5521 Special Edition (SE) लाँच केले आहेत. यांची खासियत म्हणजे हे बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आले आहेत. तरीही यात 12 व्या पिढीच्या Intel Core प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. गेमिंग लॅपटॉप असल्यामुळे यात एक शानदार कुलिंग सिस्टम देण्यात आली आहे, जी हेवी गेमिंगनंतर देखील लॅपटॉपचं तापमान मेंटेन ठेवतो. 

स्पेसिफिकेशन्स 

Dell G15 5520 लॅपटॉपमध्ये 2 साईडेड नॅरो बेजलसह 15.6 इंचाचा FHD डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz किंवा 165Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्पेशल एडिशनमध्ये 3 साईडेड नॅरो बेजलसह 240Hz रिफ्रेश रेट असलेला QHD पॅनल मिळतो. लॅपटॉप वॉयस बूटिंग टेक्नॉलॉजी से लैस आहे.  

नवीन बजेट गेमिंग लॅपटॉप पण थर्मल डिजाइनसह येतात.  दोन्ही लॅपटॉपमध्ये 12th Gen Intel Core i5 आणि Intel Core i7 H-Series प्रोसेसर मिळतो. त्याचबरोबर NVIDIA GeForce RTX™ 3070 Ti GPU आणि 8GB GDDR6 पर्यंत VRAM मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी 3x USB 3.2 Gen 1 Type-A, 1x Thunderbolt 4/USB Type-C पोर्ट, 1x HDMI 2.1, 3.5mm ऑडियो जॅक, WiFi 6 आणि Bluetooth 5.2 मिळतं.   

लॅपटॉप मध्ये गेमिंग प्रोफाईल आणि अन्य हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर सेटिंग्ससाठी एलियनवेयर कमांड सेंटर आणि गेम शिफ्ट G की देण्यात आली आहे, जी गेमिंग एक्सपीरियंस सुधारते. डिवाइसमध्ये 12-zone RGB LED लाईटिंग देण्यात आली आहेत, जी गेमिंग करताना ऑन करता येते आणि इतरवेळी बंद करता येते. गेमर्ससाठी लॅपटॉपमध्ये डॉल्बी ऑडियो सपोर्ट मिळतो.  

किंमत 

Dell G15 5520 भारतात 85,990 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. तर Dell G15 5521 SE लॅपटॉप 1,18,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Dell G15 5520 लॅपटॉप Dark Shadow Grey कलर आणि 5521 SE Obsidian Black कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे. हे डिवाइस Dell Exclusive Store आणि Dell.Com वरून विकत घेता येतील.  

Web Title: Dell G15 5520 And G15 5521 Special Edition SE Launched In India  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.