बाबो! 64GB RAM आणि 4TB स्टोरेजसह Dell चे नवे लॅपटॉप आले भारतात; ‘इतकी’ आहे किंमत 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 11:19 AM2022-06-30T11:19:16+5:302022-06-30T11:20:34+5:30

Dell Latitude आणि Precision सीरीजचे नवीन लॅपटॉप भारतीयांच्या भेटीला आले आहेत.

Dell latitude and precision series mobile work stations launched in india   | बाबो! 64GB RAM आणि 4TB स्टोरेजसह Dell चे नवे लॅपटॉप आले भारतात; ‘इतकी’ आहे किंमत 

बाबो! 64GB RAM आणि 4TB स्टोरेजसह Dell चे नवे लॅपटॉप आले भारतात; ‘इतकी’ आहे किंमत 

Next

Dell नं भारतात Latitude आणि Precision सीरीजचे लॅपटॉप भारतात लाँच करण्यात आले आहेत. कंपनीनं इंडस्ट्रीमधील सर्वात दमदार 14 इंची Mobile Work Station (MWS) लाँच केल्याचा दावा केला आहे. सोबत 15 इंचाचा सर्वात छोटा बिजनेस PC आहे. कंपनीचे हे सर्व लॅपटॉप 2-इन-1 फॉर्म फॅक्टरसह सादर करण्यात आले आहेत.  

शानदार स्पेसिफिकेशन्स 

Dell चे सर्व नवीन लॅपटॉप 12th Gen Intel Core प्रोसेसरसह येतात. यात 5G कनेक्टिव्हिटी आणि Wi-Fi 6E ची कनेक्टव्हिटी मिळते. Dell Precision 5470 मध्ये 14 इंचाची स्क्रीन मिळते, यात 12th Gen Intel Core i9 प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. सोबत 64GB DDR5 RAM आणि 4TB स्टोरेज मिळते. लॅपटॉप NVIDIA RTX A1000 ग्राफिक्स कार्डला सपोर्ट करतो. थर्मल कूलिंग सिस्टममुळे हेव्ही टास्कनंतर देखील डिवाइस थंड राहतो.   

Precision 5570 मध्ये हेच फीचर्स NVIDIA RTX A2000 ग्राफिक्ससह देण्यात आले आहेत.  तर Precision 3470 मध्ये 12th Gen Intel Core i7 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत NVIDIA T550 (4GB) DDR6 ग्राफिक्स कार्ड मिळतो. सोबत अ‍ॅडव्हान्स थर्मल मॅनेजमेंट फीचर देण्यात आलं आहे.   

अल्ट्रा प्रीमियम PC Latitude 9430 मध्ये 14 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा आस्पेक्ट रेश्यो 16:10 आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी यात एक FHD वेबकॅम देण्यात आला आहे. लॅपटॉप नवीन मेटॅलिक ग्रॅफाइट कलर ऑप्शनमध्ये येतो. तर Latitude 7330 आणि Latitude 7430 अल्ट्रालाईट कंफिगरेशनसह आले आहेत. हा जगातील सर्वात छोटा आणि हलका लॅपटॉप असल्याचा दावा करण्यात आला आहे. 13.3 इंचाचा डिस्प्ले 16:9 आस्पेक्ट रेश्योसह देण्यात आला आहे.  

किंमत 

Dell Latitude 9430 ची किंमत 1,45,990 रुपये आहे. Dell Latitude 7430 ची 94,990 रुपये, Dell Latitude 7330 ची 99,990 रुपये, Dell Precision 5570 ची 1,42,990 रुपये, Dell Precision 5470 ची 1,46,990 रुपये आणि Dell Precision 3470 ची किंमत 79,990 रुपयांपासून सुरु होईल.  

Web Title: Dell latitude and precision series mobile work stations launched in india  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.