डर्बी तंत्रज्ञानाने युक्त ऑप्टोमा प्रोजेक्टर

By शेखर पाटील | Published: August 14, 2017 02:39 PM2017-08-14T14:39:52+5:302017-08-14T19:04:04+5:30

ऑप्टोमा कंपनीने ऑप्टोमा एचडी२७एसए हे प्रोजेक्टर भारतीय बाजारपेठेत उतारले असून यात डर्बी व्हिजुअल प्रेझेन्स या प्रणालीच्या मदतीने दर्जेदार आणि सजीव चलचित्र अनुभुती घेता येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Derby-powered Optima projector | डर्बी तंत्रज्ञानाने युक्त ऑप्टोमा प्रोजेक्टर

डर्बी तंत्रज्ञानाने युक्त ऑप्टोमा प्रोजेक्टर

Next
ठळक मुद्देऑप्टोमा प्रोजेक्टर हे फुल एचडी म्हणजेच १०८० बाय १९२० पिक्सल्स क्षमतेच्या प्रतिमांना प्रक्षेपित करते.यातील डर्बी व्हिजुअल प्रेझेन्स या प्रणालीच्या मदतीने दर्जेदार आणि सजीव चलचित्र अनुभुती घेता येते.हे प्रोजेक्टर आकाराने अत्यंत आटोपशीर आणि वजनाने हलके आहे.

ऑप्टोमा कंपनीने ऑप्टोमा एचडी२७एसए हे प्रोजेक्टर भारतीय बाजारपेठेत उतारले असून यात डर्बी व्हिजुअल प्रेझेन्स या प्रणालीच्या मदतीने दर्जेदार आणि सजीव चलचित्र अनुभुती घेता येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

भारतीय बाजारपेठेत प्रोजेक्टर उत्पादनांची गती आता वाढू लागली आहे. कधी काळी फक्त कार्पोरेट प्रेझेंटेशन्ससाठी वापरण्यात येणारे प्रोजेक्टर आता व्यवसायासह घरगुती वापरातील अविभाज्य घटक बनू लागला आहे. यातच एलजी, सॅमसंग आदींसारख्या मातब्बर कंपन्यांनीदेखील भारतीय ग्राहकांना प्रोजेक्टर सादर केले आहेत. या पार्श्‍वभूमिवर ऑप्टोमा एचडी२७एसए हे प्रोजेक्टर ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. शीर्षकात नमूद केल्यानुसार यात डर्बी व्हिजुअल प्रेझेन्स हे खास तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. याच्या मदतीने चलचित्रातील रंगसंगती व खोली आदींवर अनुकुल परिणाम होत असून ते अगदी सजीव वाटत असल्याचा कंपनीने दावा केला आहे. यात ३२०० ल्युमेन्स क्षमतेचा लाईट असून तो ८००० तासांपर्यंत उत्तमरित्या वापरता येत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. तर ३०,०००:१ असा कॉन्ट्रास्ट रेषो प्रदान करण्यात आला आहे. हे प्रोजेक्टर स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट, संगणक, गुगल क्रोमकास्टसारखी उपकरणे, पीएस४ वा एक्सबॉक्स वनसारखे गेमिंग कन्सोल्स, टिव्ही डोंगल्स आदी उपकरणांना कनेक्ट करता येते. यावर प्रतिमा, व्हिडीओ, वेबपेजेस आदी पाहता तसेच शेअर करता येतात. तर यावरून गेमिंगचाही आनंद घेणे शक्य आहे. यात ‘स्मार्ट इको’ ही प्रणाली असून यामुळे वाढीव ब्राईटनेस लेव्हलने चलचित्र पाहता येतात. डिझाईनचा विचार करता हे प्रोजेक्टर आकारने अतिशय आटोपशीर आणि वजनाने हलके असल्याने याचा पोर्टेबल वापर सहजपणे करता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

ऑप्टोमा प्रोजेक्टर हे फुल एचडी म्हणजेच १०८० बाय १९२० पिक्सल्स क्षमतेच्या प्रतिमांना प्रक्षेपित करते. उपकरणांच्या कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये एचडीएमआय, एमएचएल, युएसबी आदी सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. हे प्रोजेक्टर १० वॅट क्षमतेच्या ध्वनी प्रणालीने सज्ज असून याच्या मदतीने सुश्राव्य ध्वनीची अनुभुती घेता येते. ऑप्टोमा एचडी२७एसए या मॉडेलचे मूल्य आणि उपलब्धता येत्या काही दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याचे ऑप्टोमा टेक्नॉलॉजीज या कंपनीने जाहीर केले आहे.

Web Title: Derby-powered Optima projector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.