धांसू Trick! कोणाला न कळताच कॉल, मेसेज करा, तुमचा नंबरही दिसणार नाही...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 05:37 PM2023-01-16T17:37:39+5:302023-01-16T17:37:57+5:30
काही जुनी प्रेमप्रकरणे असतील, जुने मित्र असतील, ज्यांच्याशी तुमचे वाद असतील. त्यांना तुम्हाला फोन करायचे असतील, किंवा मेसेज करायचे असतील. परंतू कसे करणार?
आजकाल तुम्हाला अनेक चित्रविचित्र नंबरवरून सेल्स कंपन्यांचे कॉल येत असतील. काही जुनी प्रेमप्रकरणे असतील, जुने मित्र असतील, ज्यांच्याशी तुमचे वाद असतील. त्यांना तुम्हाला फोन करायचे असतील, किंवा मेसेज करायचे असतील. परंतू कसे करणार? तुमचा नंबर पाहून तो कॉल बंद केला तर... आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत, जिथे समोरच्याला तुमचा नंबरच दिसणार नाहीय....
तुम्ही तुमचा नंबर कोणालाही कळू न देता फोन करू शकता. यासाठी तुम्हाला काय करावे लागेल...
यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या Android फोनमध्ये Text Me नावाचे अॅप डाउनलोड करावे लागेल. तुमच्याकडे एकच सिमचा फोन असेल किंवा एकच सिम असेल तर हे अॅप तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.
अॅप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला येथे साइन अप करावे लागेल. स्वत:ची नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला तो नंबर द्यावा लागेल जो तुम्हाला इतरांना दिसला पाहिजे आहे. म्हणजेच, तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही क्रमांक टाकू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.
पण तुम्ही सबस्क्रिप्शनशिवायही कॉल करू शकता. तुम्हाला अॅप डाउनलोड करण्यासाठी काही क्रेडिट्स मिळतील. या क्रेडिट्सचा वापर करून तुम्ही कोणालाही कॉल करू शकाल.
कॉल करण्यासाठी तुम्हाला तळाशी एक डायलर पॅड दिला जाईल. त्यावर टॅप करा आणि नंतर कोणताही नंबर डायल करा. असे केल्यावर तुमचा कॉल समोरच्या व्यक्तीकडे जाईल तेव्हा त्याला दिसणारा नंबर वेगळा असेल. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त नंबर वापरायचे असतील तर तुम्हाला त्यासाठी पैसे द्यावे लागतील. या अॅपद्वारे तुम्ही तुमचा नंबर न देता कोणाशीही चॅटदेखील करू शकता.
(टीप: ही माहिती एनबीटीने दिली आहे. तुम्ही तुमच्या जबाबदारीवर हे अॅप वापरून पाहू शकता.)