डिजिटल डिटॉक्स : तुमची मुले फोनवर काय काय बघतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 08:53 AM2021-06-10T08:53:33+5:302021-06-10T08:54:04+5:30

Digital Detox: गुगलचे डिजिटल वेलबीइंगचे प्रयत्नही अतिशय इंटरेस्टिंग आहेत. wellbeing.google.com या साइटवर गेलात, तर तिथे आपले आयुष्य आणि टेक्नॉलॉजी याचा समतोल कसा साधता येईल याची भरपूर माहिती मिळू शकते.

Digital Detox: What do your kids see on the phone? | डिजिटल डिटॉक्स : तुमची मुले फोनवर काय काय बघतात?

डिजिटल डिटॉक्स : तुमची मुले फोनवर काय काय बघतात?

Next

- मुक्ता चैतन्य, समाज माध्यमाच्या अभ्यासक

कोरोनाच्या आधीपासून आपल्या मुलांच्या हातात त्यांचे किंवा पालकांचे फोन आहेत. कोरोनानंतर मुलांचा स्क्रीन टाइम प्रचंड वाढलेला आहे, हेही आपल्याला माहीत आहे. मोठ्यांच्या फोनमध्ये अनेक गोष्टी असतात. व्हॉटस्‌ॲपवरून आलेले चावट मिम्स, सेक्स जोक्स, पॉर्न क्लिप्स, कुठेतरी दंगल किंवा हिंसाचार झाला असेल, तर त्याचे फोटो, व्हिडिओ, राजकीय कार्टुन्स किंवा मॉर्फ केलेले फोटो व्हिडिओ आणि अनंत गोष्टी. मोठ्यांचे जग जे वाचते, बघते, ऐकते ती प्रत्येक गोष्ट लहान मुलांसाठी नसते.

सगळा कन्टेन्ट मुलांनी बघण्या-वाचण्यालायक असतोच असे नाही; पण जेव्हा मोठ्यांचे फोन लहान मुलांच्या हातात जातात तेव्हा लहानांसाठी नसलेले मोठ्यांचे जग अचानक त्यांच्या पुढ्यात उघडते आणि ज्या कन्टेन्टचा ते ग्राहकच नाहीत तोही कन्टेन्ट ते बघायला, वाचायला, ऐकायला लागतात. म्हणूनच पेरेंटल कंट्रोल्स वापरणे गरजेचे आहे.

आपल्या फोनच्या सेटिंगमध्ये पेरेंटल कंट्रोल असा पर्याय असतो. तो चालू केला की 
काय- काय घडते ते बघूया. 
१) तुम्ही जर कुठले फॅमिली लिंक ॲप वापरत असाल, तर तुमच्या मुलांच्या वापरावर तुम्हाला बारीक लक्ष ठेवता येते. २) पेरेंटल कंट्रोल्स चालू केले की, आपले मूल आपला फोन किती वापरतेय हे समजू शकते. ३) मुलांचा आपल्या फोनवरचा स्क्रीन टाइम किती आहे, गुगलच्या कुठल्या गोष्टी त्यांनी बघितल्या, हे समजू शकते. ४) त्यांनी कुठल्या साइटस्‌ वापरायच्या नाहीत हे पालकांना ठरवता येते. ५) मुले जर पालकांचा फोन वापरत असतील, तर त्यांच्या डिजिटल फूटप्रिंटन्सवर लक्ष ठेवता येते. 

याखेरीज काही डिजिटल वेलबीइंग ॲप्सदेखील आज उपलब्ध आहेत. जसे की आपण आपल्या फोनचे स्क्रीन लॉक किती वेळा उघडतो हे जाणून घेण्यासाठी ॲप आहे. स्क्रीन वेळ कसा कमी करता येईल, याचा विचार आपण करू शकतो. 
गुगलचे डिजिटल वेलबीइंगचे प्रयत्नही अतिशय इंटरेस्टिंग आहेत. wellbeing.google.com या साइटवर गेलात, तर तिथे आपले आयुष्य आणि टेक्नॉलॉजी याचा समतोल कसा साधता येईल याची भरपूर माहिती मिळू शकते. अनेक ॲप्सची माहितीही या साइटवर उपलब्ध आहे, जी वापरून तुम्ही तुमचा स्क्रीन टाइमही कमी करू शकता आणि डिजिटल आयुष्यावर ताबाही ठेवू शकता.

Web Title: Digital Detox: What do your kids see on the phone?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.