कागद-पेन विसरुन जा..! हात दुखेल पण 'या' पॅडची बॅटरी संपणार नाही; पाहा फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 07:43 PM2022-11-23T19:43:18+5:302022-11-23T19:45:04+5:30

या डिजिटल रायटिंग पॅडची किंमत 200 रुपयांपेक्षा कमी आहे.

Digital wrinting Pad: Forget paper and pen..! this pad won't run out of battery; Check out the features... | कागद-पेन विसरुन जा..! हात दुखेल पण 'या' पॅडची बॅटरी संपणार नाही; पाहा फीचर्स...

कागद-पेन विसरुन जा..! हात दुखेल पण 'या' पॅडची बॅटरी संपणार नाही; पाहा फीचर्स...

googlenewsNext


Digital Pad: तुम्ही दैनंदिन कामामध्ये नोट्स बनवण्यासठी डायरीचा वापर करत असाल, तर आज आम्ही तुम्हाल एका डिजिटल डायरीबाबत सांगणार आहोत. सामान्य डायरीवर किंवा एखाद्या कागदावर लिहण्यासाठी पेन, शाई, पेपर इत्यादींची गरज भासते. पण, या डिजिटल डायरीसाठी तुम्हाला कशाचीही गरज भासणार नाही. आज आम्ही तुम्हाला एका डिजिटल रायटिंग पॅडबाबत सांगणार आहोत.

या डिव्हाइसचे नाव thriftkart Writing pad Drawing Tablet Tab with Pen Electronic LCD Kids Tablet आहे. हा एक एलसीडी रायटिंग पॅड आहे, ज्यावर तुम्ही एकदाम आरामशीर लिहू शकता. विशेष म्हणजे, या रायटिंग पॅडला तुम्ही कुठेही अगदी सहज कॅरी करू शकता. हे डिव्हाइस अमॅझॉन किंवा फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. या डिव्हाइसची किंमत 160-170 रुपयांपासून सुरू होते.

या डिव्हाइसवर तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने आणि जलग गतीने लिहू शकता. यावर लिहिण्यासाठी तुम्हाला एक स्टायलस किंवा टच पेन दिला जातो. यावर लिहिलेले एका क्लिकवर डिलिट करता येते. विशेष म्हणजे, पॅडवर लॉक बटन आहे. याच्या मदतीने तुम्ही लिहिलेले लॉकही करू शकता. या डिव्हाइसची खासियत म्हणजे याची बॅटरी अनेक वर्षे चालवू शकता. पण, यावरील मजकुर एकदा डिलिट केल्यानंतर तुम्ही पुन्हा तो परत आणू शकत नाही.
 

Web Title: Digital wrinting Pad: Forget paper and pen..! this pad won't run out of battery; Check out the features...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.