Diwali 2019 : WhatsApp वर स्टिकर्स पाठवून अशा द्या दिवाळीच्या खास शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 04:07 PM2019-10-25T16:07:30+5:302019-10-25T16:22:14+5:30

दिवाळीनिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. सण-समारंभांना शुभेच्छा दिल्या जातात. व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवरून शुभेच्छांचे मेसेज करता येतात.

diwali 2019 whatsapp stickers how to download and send whatsapp stickers | Diwali 2019 : WhatsApp वर स्टिकर्स पाठवून अशा द्या दिवाळीच्या खास शुभेच्छा

Diwali 2019 : WhatsApp वर स्टिकर्स पाठवून अशा द्या दिवाळीच्या खास शुभेच्छा

Next

नवी दिल्ली - दिवाळीनिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. सण-समारंभांना शुभेच्छा दिल्या जातात. व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवरून शुभेच्छांचे मेसेज करता येतात. व्हॉट्सअ‍ॅपही आपल्या युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. यावेळी दिवाळी स्टिकर्सच्या माध्यमातून मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांना शुभेच्छा देता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून वेगवेगळे स्टिकर्स पाठवून दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला सुरुवात झाली आहे. 

व्हॉट्सअ‍ॅपवर स्टिकर्ससाठी सर्वप्रथम युजर्सच्या डिव्हाईसवर व्हॉट्सअ‍ॅपचं लेटेस्ट व्हर्जन इन्स्टॉल असणं गरजेचं आहे. त्यानंतर अँड्रॉईड युजर्स सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट विंडो ओपन करा. स्टिकर्ससाठी स्माईली आयकॉनवर क्लिक करा. GIF आयकॉनजवळ स्टिकर्सचा एक आयकॉन दिसेल. स्टिकर्स आयकॉनवर करा. तेथे स्टिकर्स स्टोरमध्ये विविध प्रकारचे स्टिकर पॅक्स मिळतील. पेजवर सर्वात खाली स्क्रोल करा आणि ‘Get more stickers’ वर क्लिक करा. 

अ‍ॅपवर असं केल्यावर गुगल प्ले स्टोरवर रीडायरेक्ट करेल. तेथे युजर्सना खूप स्टिकर पॅक्स सर्च आणि इन्स्टॉल करता येईल. तसेच युजर्स हवे असलेले दिवाली स्टिकर्स डाऊनलोड करू शकतात. यानंतर अ‍ॅप ओपन केल्यास स्टिकर पॅक दिसतील. जे युजर्स आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर सेक्शनमध्ये सिलेक्ट करू शकतात. स्टिकर सेक्शनमध्ये नवीन स्टिकर पॅक दिसल्यावर ते मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांना पाठू शकता. अँडॉईड युजर्स थर्ड पार्टी स्टिकर्स डाऊनलोड करून एकमेकांना पाठवू शकतात.

Whatsapp ग्रुपमध्ये अ‍ॅड व्हायचं की नाही हे आता युजर्स ठरवणार; जाणून घ्या कसं मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्सना एक अपडेट मिळालं आहे. अँड्रॉईड आणि आयओएस युजर्ससाठी ग्रुप प्रायव्हसी सेटिंग रोलआऊट केलं आहे. ज्यांच्या माध्यमातून कोणत्याही ग्रुपमध्ये अ‍ॅड व्हायचे नाही असे कॉन्टॅक्ट्स युजर्सना सिलेक्ट करता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप फॉर iOS 2.19.110.20 व्हॉट्सअ‍ॅप फॉर अँड्रॉईड बीटा 2.19.298 मध्ये ग्रुपशी संबंधित नवी प्रायव्हसी सेटिंग समोर आली आहे. यामध्ये ग्रुपमधील कोणती व्यक्ती त्यांना अ‍ॅड करू शकते हे आता युजर्स ठरवू शकणार आहेत. यासाठी लागणाऱ्या परमिशनसाठी Everyone, My Contacts आणि My Contacts Except असे तीन पर्याय देण्यात येणार आहेत. तसेच ग्रुप अ‍ॅडमिन युजर्सना सरळ अ‍ॅड करू शकत नसतील तर इन्वाईट पाठवण्याचा एक पर्याय मिळणार आहे. हे इन्वाईट स्वीकारल्यानंतरच युजर्स त्या ग्रुपचा भाग होणार आहेत. सध्या या फीचरची टेस्टिंग सुरू आहे.

Web Title: diwali 2019 whatsapp stickers how to download and send whatsapp stickers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.