सर्वात स्वस्त स्मार्टवॉच भारतात लाँच; Dizo Watch 2 Sports i देणार सिंगल चार्जवर 10 दिवसांचा बॅकअप
By सिद्धेश जाधव | Published: May 13, 2022 05:37 PM2022-05-13T17:37:15+5:302022-05-13T17:37:26+5:30
Dizo Watch 2 Sports i सोबत कंपनीनं Dizo Wireless Power i नेकबँड ईयरफोन्स देखील लाँच केले आहेत.
रियलमीच्या पार्टनर ब्रँड डिझोनं आपले दोन नवीन डिवाइस भारतात सादर केले आहेत. यातील Dizo Watch 2 Sports i स्मार्टवॉच भारतात SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर, स्लिप मॉनिटर आणि 10 दिवसांच्या बॅटरी लाईफसह आला आहे. तर Dizo Wireless Power i neckband-style ईयरफोन्स देखील भारतात शानदार ऑडिओ क्वॉलिटीसह आले आहेत.
Dizo Watch 2 Sports i
Dizo Watch 2 Sports i स्मार्टवॉचमध्ये 1.69 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले 600nits पीक ब्राईटनेससह देण्यात आला आहे. यात SpO2, हार्ट रेट सेन्सर व स्लिप मॉनिटर इत्यादी हेल्थ फीचर्स मिळतात. तसेच स्विमिंग, रनिंग, सायकलिंग इत्यादी 110 स्पोर्ट्स मोड देखील हे वॉच ओळखतं. यातील 260mAh ची बॅटरी सिंगल चार्ज वर 10 दिवस वापरता येते. कनेक्टिव्हिटीसाठी यात Bluetooth v5.2 मिळतं. हे वॉच Android किंवा iOS डिवाइस सोबत पेयर करता येतं.
Dizo Wireless Power i neckband-style
या ईयरफोन्समध्ये 11.2mm ड्रायव्हर्सचा वापर कंपनीनं केला आहे. यात शानदार व्हॉईस कॉलिंगसाठी ENC फिचर देण्यात आलं आहे. हे ईयरफोन्स 5ATM रेटिंगसह येतात, त्यामुळे पाण्यापासून सुरक्षित राहतात. यात 88 मिलिसेकंद लेटन्सी असलेला गेम मोड मिळतो. या ईयरफोन्समधील 150mAh ची बॅटरी सिंगल चार्जवर 18 तास वापरता येते.
किंमत आणि उपलब्धता
Dizo Watch 2 Sports i ची किंमत 2,599 रुपये ठेवण्यात आली आहे. हे स्मार्टवॉच Classic Black, Silver Grey आणि Passion Pink shades कलर्समध्ये 2 जूनपासून विकत घेता येईल. Dizo Wireless Power i neckband-style ईयरफोन्सची किंमत 1,499 रुपये आहे, जे आजपासून Classic Black, Yellow Black आणि Deep Blue कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध झाले आहेत.