12 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह DIZO Watch भारतात लाँच; मिळणार रियल टाइम हार्ट रेट मॉनिटरिंग सपोर्ट  

By सिद्धेश जाधव | Published: August 3, 2021 05:44 PM2021-08-03T17:44:04+5:302021-08-03T17:46:16+5:30

Dizo India launch: DIZO Watch मध्ये 90 स्पोर्ट्स देण्यात आले आहेत. या डीझो स्मार्टवॉचमधील 315mAh ची बॅटरी सिंगल चार्जवर 12 दिवसांचा बॅकअप देतो.  

Dizo watch launched in india check price and specifications  | 12 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह DIZO Watch भारतात लाँच; मिळणार रियल टाइम हार्ट रेट मॉनिटरिंग सपोर्ट  

12 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह DIZO Watch भारतात लाँच; मिळणार रियल टाइम हार्ट रेट मॉनिटरिंग सपोर्ट  

googlenewsNext

रियलमीने आपल्या सब-ब्रँड DIZO अंतर्गत पहिला स्मार्टवॉच DIZO Watch भारतात लाँच केला आहे. या स्मार्टवॉचचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा Realme Watch 2 रीब्रँड व्हर्जन वाटत आहे. DIZO Watch सिंगल चार्जमध्ये 12 दिवसांचा बॅकअप देऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. या डीझो स्मार्टवॉचमध्ये अनेक स्पोर्ट्स मोड आणि हेल्थ ट्रॅकिंग फीचर देण्यात आले आहेत. 

DIZO Watch चे स्पेसिफिकेशन्स  

DIZO Watch मध्ये कंपनीने 1.4-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले दिला आहे या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 320 x 320 पिक्सल आणि ब्राईटनेस 600 निट्स आहे. हा डिजो स्मार्टवॉच IP68 रेटिंगसह येतो, यात 60 पेक्षा जास्त वॉच फेस मिळतात. DIZO Watch मध्ये रनिंग, वॉकिंग, इंडोर आणि आउटडोर सायकलिंग, स्पायनिंग, हायकिंग, बास्केटबॉल, योगा, रोविंग, इलिप्टिकल, क्रिकेट, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि फ्री वर्कआउट असे 90 स्पोर्ट्स देण्यात आले आहेत.  

या स्मार्टवॉचमध्ये PPG सेन्सर, रियल टाइम हार्ट रेट सेन्सर, SpO2 ट्रॅकिंग, स्लीप मॉनीटरिंग, स्टेप काउंटर, कॅलरी काऊंटर आणि वॉटर इनटेक रिमाइंडर सारखे फीचर देखील देण्यात आले आहेत. या डीझो स्मार्टवॉचमधील 315mAh ची बॅटरी सिंगल चार्जवर 12 दिवसांचा बॅकअप देते.  

DIZO Watch ची किंमत 

DIZO Watch भारतात 3,499 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. परंतु लाँच ऑफर अंतगर्त हा स्मार्टवॉच 6 ऑगस्टला फक्त 2,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.  

Web Title: Dizo watch launched in india check price and specifications 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.