स्वस्त GoPods D इयरबड्स आणि Wireless Bluetooth Headset लाँच; रियलमीच्या DIZO ब्रँडची कमाल
By सिद्धेश जाधव | Published: July 1, 2021 04:28 PM2021-07-01T16:28:14+5:302021-07-01T16:28:49+5:30
Realme TechLife इव्हेंटच्या माध्यमातून DIZO ब्रँडचे प्रोडक्ट्स भारतात सादर केले आहेत. कंपनीने Realme GoPods D इयरबड्स आणि Wireless Bluetooth Headset सादर केले आहेत.
Realme TechLife इव्हेंटच्या माध्यमातून DIZO ब्रँडने भारतात पदार्पण केले आहे. या ब्रँडने कंपनीने GoPods D इयरबड्स आणि Wireless Bluetooth Headset सादर केले आहेत. हे प्रोडक्ट्स Flipkart आणि निवडक ऑफलाइन स्टोरच्या माध्यमातून विकले जातील. DIZO Wireless Bluetooth Headset 7 जुलैपासून विकत घेता येईल. तर, DIZO GoPods D चा पहिला सेल 14 जुलैला दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात येईल.
किंमत आणि ऑफर
DIZO GoPods D ची किंमत कंपनीने 1,599 रुपये ठेवण्यात आली आहे. पहिल्या सेलमध्ये 200 रुपये डिस्काउंट मिळेल त्यामुळे हा डिवाइस 1,399 रुपयांमध्ये विकत घेता येईल. DIZO Wireless भारतात 1,499 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. यावर देखील पहिल्या सेलमध्ये 200 रुपयांच्या डिस्काउंटसह 1,299 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
DIZO GoPods D
DIZO GoPods D एका TWS (ट्रू वायरलेस) इयरबड्स आहेत. यात 10mm बेस बूस्ट ड्रायव्हर आणि ब्लूटूथ 5.0 कनेक्टिविटी फीचर देण्यात आला आहे. हे बड्स 5 तासांचा बॅटरी बॅकअप देतात. चार्जिंग केसची जोड मिळाल्यावर 20 तासांचा प्लेबॅक टाइम मिळतो. यात 110ms लो लेटन्सीसह गेम मोड फीचर देण्यात आला आहे. त्याचबरोबर एन्व्हायर्मेंटल नॉइज कॅन्सलेशन, स्मार्ट टच कंट्रोल आणि IPX4 वाटर रेजिस्टन्स असे फीचर देण्यात आले आहेत.
DIZO Wireless Bluetooth Headset
Wireless Bluetooth Headset मध्ये 11.2mm चा ऑडियो ड्रायव्हर बेस बूस्ट प्लस अल्गोरिदमसह देण्यात आला आहे. या डिवाइसमधील 150mAh ची बॅटरी 17 तासांचा बॅटरी बॅकअप देते, असा दावा कंपनीने केला आहे. Wireless Bluetooth Headset IPX4 वाटर रेजिस्टन्स आहेत. यातला गेमिंग मोड 88ms लो लेटन्सी सह सादर करण्यात आला आहे.