अरे वा! 10 मिनिटांच्या चार्जवर 10 तास गाणी ऐका, येतायत रियलमचे शानदार ब्लूटूथ ईयरफोन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 03:34 PM2022-05-10T15:34:41+5:302022-05-10T15:34:51+5:30
DIZO Wireless Dash नेकबँड स्टाइड वायरलेस ईयरफोन्स भारतात लाँच होणार आहेत.
रियलमीच्या पार्टनर ब्रँड Dizo आपल्या वायरलेस ईयरफोनचा पोर्टफोलियो वाढवणार आहे. नेकबँड स्टाईल DIZO Wireless Dash नावाच्या वायरलेस ईयरफोन्सच्या लौंची माहिती समोर आली आहे. 17 मेला दुपारी 12 वाजता एका इव्हेंटच्या माध्यमातून हे इयरफोन्स लाँच केले आतील. या इयरफोन्समधील काही महत्वाच्या स्पेक्स आणि फीचर्सची माहिती देखील समोर आली आहे.
पुढील आठवड्यात एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून DIZO Wireless Dash भारतीय ग्राहकांच्या भेटीला येतील. हा इव्हेंट 17 मेला दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या इयरफोन्सची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाईल. लाँचपूर्वीच एक प्रोडक्ट पेज फ्लिपकार्टवर लाईव्ह करण्यात आलं आहे. इथे हा फोन ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन कलर व्हेरिएंटसह दिसला आहे.
कंपनीनं दावा केला आहे की, नवीन डिजो वायरलेस डॅश फुल चार्जमध्ये 30 तास म्यूजिक प्लेबॅक देतील. तसेच यात पहिल्यांदाच Blink Charge हे फास्ट चार्जिंग फिचर देण्यात येईल. त्यामुळे फक्त इयरफोन्स 10 मिनिटाच्या चार्जवर 10 तासांचा प्लेबॅक टाइम देतील.
फास्ट चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळेल. युजर्सच्या सुरक्षेसाठी सेफ चार्जिंग चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. यामुळे शॉर्ट सर्किटपासून बचाव होतो आणि चार्जिंग सुरु असताना दौरान पावर सप्लाय स्थिर राहते. DIZO Wireless Dash मध्ये शानदार साऊंड क्वॉलिटीसाठी 11.2mm च्या ड्रायव्हरचा वापर करण्यात आला आहे. यांच्या आणि उपलब्धतेची माहिती लाँचच्या वेळी देण्यात येईल.