स्मार्टफोनचा स्मार्ट वापर... आता आणखी सोयीस्कर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 06:16 PM2019-06-19T18:16:23+5:302019-06-19T18:22:26+5:30

अ‍ॅन्ड्रॉइड तंत्रज्ञानामुळे विविध कंपन्यांचे स्मार्ट फोन परवडणाऱ्या किमतीमध्ये बाजारात आता उपलब्ध झाले आहेत. तरुण पिढीपासून वयोवृद्धांपर्यंत, मध्यमवर्गीयांपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आले आणि त्यात अ‍ॅन्ड्रॉइडचे प्रमाण सर्वात जास्त आहे.

Do the Smartphone's smart use its benificial for you | स्मार्टफोनचा स्मार्ट वापर... आता आणखी सोयीस्कर!

स्मार्टफोनचा स्मार्ट वापर... आता आणखी सोयीस्कर!

Next

शिल्पा कुलकर्णी-मोहिते

अ‍ॅन्ड्रॉइड तंत्रज्ञानामुळे विविध कंपन्यांचे स्मार्ट फोन परवडणाऱ्या किमतीमध्ये बाजारात आता उपलब्ध झाले आहेत. तरुण पिढीपासून वयोवृद्धांपर्यंत, मध्यमवर्गीयांपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आले आणि त्यात अ‍ॅन्ड्रॉइडचे प्रमाण सर्वात जास्त आहे. एका सर्वेक्षणानुसार भारतातील स्मार्ट फोन वापरणाऱ्या पाचपैकी चार लोकांकडे अ‍ॅन्ड्रॉइड फोन असतो. या फोनवर आपण ईमेल, कॉन्टॅक्टस्, बँकेची माहिती आणि बरीच वैयक्तिक माहिती ठेवतो. त्यामुळे या फोनला सुरक्षित ठेवणे गरजेचे असते. मंत्रतंत्राचा या लेखमालेत आज अ‍ॅन्ड्रॉइड फोनच्या सुरक्षिततेबद्दल जाणून घेऊ.

1. स्क्रीन लॉक - फोनला स्क्रीन लॉक ठेवा. दुसऱ्यांना सहज लक्षात येणार नाही, असा पासवर्ड ठेवा की, ज्यामुळे जरी तुमचा फोन चुकीच्या हातात पडला तरी त्यांना सहजासहजी फोनमधील डेटा वाचता येणार नाही. अधिक सुरक्षिततेसाठी हा पासवर्ड वेळोवेळी बदलावा.

2. अ‍ॅन्टीवायरस - संगणकाप्रमाणेच फोनमध्येसुद्धा वायरस येऊ शकतो. फोनसाठी उपलब्ध असलेले अद्ययावत अ‍ॅण्टीवायरस वापरुन फोनला वायरसच्या हल्ल्यापासून वाचवा. अ‍ॅण्टीवायरस असला तरी अवैध वेबसाइट तसेच अनोळखी इमेलपासून सावध राहणे गरजेचे आहे.

3. विश्वासू अ‍ॅप्स - अ‍ॅप्स डाऊनलोड करताना ते कुठल्या कंपनीने बनवलेले आहेत आणि ते विश्वासू आहेत की नाहीत हे तपासून पहा. काही अवैध अ‍ॅप्स तुमच्या फोनमधून वैयक्तिक माहिती चोरू शकतात किंवा वायरस पसरवू शकतात. गरज असलेले आणि ओळखीच्या प्रकाशकांचेच अ‍ॅप्स डाऊनलोड करा. अ‍ॅप्स इन्स्टॉल करताना फोनचा कॅमेरा, कॉन्टॅक्टस् इत्यादी वापरण्याची परवानगी मागितली जाते. ती नीट तपासून गरज असेल, त्याच गोष्टींची परवानगी द्यावी.

4. अनोळखी नेटवर्क - सार्वजनिक जागांवर इंटरनेट वापरताना अनोळखी आणि असुरक्षित नेटवर्कला कनेक्ट करू नका. या नेटवर्कद्वारे तुमच्या फोनमध्ये शिरकाव करण्याची संधी लोकांना मिळू शकते आणि तुमची माहिती चोरली जाऊ शकते.

5. रिमोट वाईप - कधी होऊ नये, पण बऱ्याच वेळा होणारी गोष्ट म्हणजे फोन चोरीला जाणे. फोन गेल्याचे दु:ख व्हायचे ते होतेच. पण फोनबरोबर फोनमधील बरीच वैयक्तिक माहिती गेल्यामुळे भीती वाढते. रीमोट वाईपच्या मदतीने तुम्ही फोनवरील सगळी माहिती पुसून टाकू शकता. रीमोट वाईपची सुविधा काही फोनमध्ये उपलब्ध असते, तसे नसल्यास थर्ड पार्टी अ‍ॅप्सच्या मदतीने हे करता येते. फोन विकत घेतल्यावर लगेचच ही सुविधा फोनमध्ये कॉन्फिगर करावी.

6. ऑपरेटिंग सिस्टम अपडेट - फोनची ऑपरेटिंग सिस्टम फोनचा महत्त्वाचा भाग असतो. कंपन्या नवनवीन ऑपरेटिंग सिस्टमच्या आवृत्ती प्रकाशित करतात. नियमित उपलब्ध असलेले अपडेट्स इन्स्टॉल करून फोन अद्ययावत ठेवा.

(लेखिका या टेक्नोक्रॅट आहेत.)

Web Title: Do the Smartphone's smart use its benificial for you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.