आता WhatsApp वरुन HD क्वालिटीचे फोटो पाठवता येणार; फक्त ही सेटींग करा, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 03:11 PM2022-11-05T15:11:05+5:302022-11-05T15:11:47+5:30
WhatsApp आपल्या आयुष्यातील एक महत्वाचे घटक झाले आहे. दर मिनिटाला व्हॉट्सअॅप चेक करण्याची सवय सध्या अनेकांना लागली आहे.
WhatsApp आपल्या आयुष्यातील एक महत्वाचे घटक झाले आहे. दर मिनिटाला व्हॉट्सअॅप चेक करण्याची सवय सध्या अनेकांना लागली आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर कामासाठीही केला जात आहे. व्हॉट्सअॅपने बिझनेस अॅपही आणले आहे. त्यामुळे अनेकांनी या प्लॅफॉर्मचा वापर बिझनेससाठी केला आहे, यावरुन फोटो पाठवले जातात. पण, आता पाठवलेले फोटो खराब क्वालिटीचे जातात, आता व्हॉट्सअॅपने एक नवे फिचर लाँच केले आहे. यावरुन आपण HD क्वालिटीचे फोटो पाठवू शकतो. हे फिचर आपल्याला फक्त सेटींग करुन सुरू करायचे आहे. चला जाणून घेऊया हे फिचर सुरू कसे करायचे.
आतापर्यंत आपण व्हॉट्सअॅपववरुन कमी गुणवत्तेचे फोटो आपोआप पाठवत होतो, कारण डेटाचा वापर कमी होईल आणि मेसेज लवकर पाठवता येईल म्हणून आपण कमी क्वालिटीचा फोटो पाठवत होतो. आता तुम्ही ते फोटो हव्या त्या क्वालिटीचे हवे तसे पाठवू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही व्हॉट्सअॅपवर उच्च दर्जाचे फोटोही पाठवू शकता. यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन काही बदल करावे लागतील.
WhatsApp चं जबरदस्त फिचर! आता स्वत:लाही मेसेज करता येणार, नेमकं काय आहे जाणून घ्या...
पहिल्यांदा तुम्हाला WhatsApp ओपन करावे लागेल. येथे वर दिलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. आता तुमच्या समोर अनेक पर्याय दिसतील, यामध्ये तुम्ही सेटिंगवर क्लिक करा.
सेटिंग्जमध्ये तुम्हाला स्टोरेज आणि डेटामध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला फोटो अपलोड क्वालिटीचा पर्याय दिसेल. यावर क्लिक करा तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यामध्ये तीन पर्याय उपलब्ध असतील. पहिला पर्याय ऑटो आहे, जो डीफॉल्टनुसार निवडला जाईल.
याशिवाय तुम्हाला डेटा सेव्हर आणि बेस्ट क्वालिटीचा पर्याय मिळेल. ऑटो ऑप्शनवर नेटवर्क क्वालिटीनुसार फोटो पाठवले जातील. फोनमध्ये येणाऱ्या डेटानुसार अॅप फोटो पाठवेल. हाच पर्याय महत्वाचा आणि फायद्याचा आहे. जर तुम्हाला चांगल्या गुणवत्तेत फोटो पाठवायचे असतील तर तुम्ही सर्वोत्तम गुणवत्ता निवडू शकता. त्यासाठी थोडा अधिक डेटा खर्च होतो. यासाठी तुमच्या इंटरनेटच स्पीड जास्त असणे हेही गरजेचे आहे.