http आणि https मधील फरक तुम्हाला माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 10:31 AM2018-04-26T10:31:46+5:302018-04-26T10:31:46+5:30
http (हायपर टेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल)बरोबर S जोडलेला नसल्यास तुम्ही त्यावरून कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन व्यवहार करू नका.
नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वापरकर्त्यांचा डेटा चोरीला जात असल्याचा मुद्दा प्रकर्षानं समोर आला आहे. या डेटाचोरीवरून काँग्रेस आणि भाजपानं एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले होते. तसेच फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्ग यालाही डेटा चोरीप्रकरणी अमेरिकन काँग्रेसनं चांगलंच फैलावर घेतलं होतं. http (हायपर टेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल)बरोबर S जोडलेला नसल्यास तुम्ही त्यावरून कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन व्यवहार करू नका.
एचटीटीपी(हायपर टेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल)बरोबर एस असल्यास तुम्हाला तो सुरक्षेची हमी देतो. तर तुम्ही एखाद्या वेबसाइटला भेट दिली, त्यावेळी वेबसाइटच्या सुरुवातीला http:///. असं दिसल्यास तुम्ही ते संकेतस्थळ तात्काळ बंद करा. कारण त्यामुळे तुमच्या सुरक्षेला धोका पोहोचू शकतो. कदाचित http:///. च्या माध्यमातून तुमच्या कॉम्प्युटरमधील डेटाही हॅकर्स चोरू शकतात. परंतु https:///. तुम्हाला सुरक्षेची खात्री देतो. http:///. वरून सुरू होणा-या एखाद्या वेबसाइटवर तुम्ही एखादा अर्ज भरला असल्यास तुमची माहिती दुसरा कोणी तरी चोरू शकतो. तसेच क्रेडिट आणि डेबिट कार्डचे व्यवहारही http:///. वरून करणं शक्यतो टाळा. त्यापेक्षा https:///. वरून व्यवहार करण्याला प्राधान्य द्या. जर एखादी वेबसाइट तुमच्याकडे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा नंबर मागत असेल तर आधी एड्रेस बारवर https:///. पासून साइटला सुरुवात होते का नाही ते पाहा.
जर http:///. या एड्रेसबारवरून वेबसाइटला सुरुवात होत असल्यास तुमच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डाची माहिती देऊ नका. कोणत्याही वेबसाइटला भेट देण्याआधी domain extension (.com or .org, .co.in, .net etc) तपासून पाहा. समजा http://amazon.diwali-festivals.com अशी वेबसाइट असल्यास .comच्या आधीचा शब्द diwali-festivals असा आहे. त्यामुळे हे वेबपेज अॅमेझॉनशी संबंधित नाही. तर ते diwali-festivalsशी निगडीत आहे, असे समजावे. या आधी आपण असे कधीच ऐकले नव्हते. परंतु अशा पद्धतीनं डेटा चोरी होत असल्याच्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.