तुम्ही Chrome वापरताय?, मग जाणून घ्या 'या' गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 01:31 PM2019-07-29T13:31:08+5:302019-07-29T13:39:14+5:30
काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, Incognito Modeमध्ये यूजर्सच्या अॅक्टिव्हिटी वेबसाइट्सद्वारे ट्रॅक केले जातेय.
नवी दिल्ली: गुगल कंपनी क्रोम ब्राऊजरला नवीन Chrome 76 सोबत अपग्रेड करणार आहे. गुगल हे अपडेट 30 जुलैला रिलीज करणार आहे. गुगलचे म्हणणे आहे की, या नवीन अपडेटसह क्रोम यूजर्संना प्रायव्हसीमध्ये पहिल्यापेक्षा बदल करून अधिक चांगले बनविले जाईल. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, Incognito Modeमध्ये यूजर्सच्या अॅक्टिव्हिटी वेबसाइट्सद्वारे ट्रॅक केले जातेय. या समस्यांचा विचार करून गुगल Chrome 76 अपडेट घेऊन येत आहे.
Chrome Incognito mode has been detectable for years, due to the FileSystem API implementation. As of Chrome 76, this is fixed.
— Paul Irish (@paul_irish) June 11, 2019
Apologies to the "detect private mode" scripts out there. 💐 pic.twitter.com/3LWFXQyy7w
जाणून घ्या काय होणार आहे बदल:
- गुगल क्रोम आता सर्व साइट्ससाठी Adobe Flash आता बाय डिफॅाल्ट डिसेबल राहील. यूजर्स अनेबल करू शकतील, पण फ्लॅशचा वापर फक्त क्लिक टू प्ले मोडमध्येच करता येईल.
- क्रोम 76 आल्यानंतर जर यूजर्सने डार्क मोड चालू ठेवला असेल तर साइट्स ऑटोमॅटिकली यूजर्सला डार्क थीमसोबत कनेक्ट दाखवेल.
काही वेबसाइट्स फाइल सिस्टम एपीआई रिक्वेस्ट पाठवून यूजर्सच्या Incognito Modeला डिटेक्ट करता येत होती जी आता या मोडमुळे डिसेबल राहणार आहे. तसेच काही वेबसाइट्स या ट्रिकच्या सहाय्याने Incognito Modeमध्ये राहणाऱ्या यूजर्सला ब्लॅाक करायच्या. कारण याच्या सहाय्याने वेबवर पेवॉलला बायपास करण्यासाठी सोपे होते. नवीन अपडेटमध्ये गुगल या समस्येला दूर करेल.
- क्रोम ओएसवर जास्त तर यूजर्स नोटिफिकेशनला साफ करत नाहीत. कारण गुगल Clear All हे ऑप्शन सर्वात खाली आहे.
- परंतु या अपडेटमुळे हे बदलून Clear All हे ऑप्शन वरती असणार आहे.