OMG! डोळ्यांचा उपचार करण्यासाठी डॉक्टर वापरतायत iPhone 13 Pro Max चा कॅमेरा  

By सिद्धेश जाधव | Published: October 5, 2021 01:07 PM2021-10-05T13:07:04+5:302021-10-05T13:07:29+5:30

iPhone 13 Pro Max camera for eye treatment: एका नेत्र रोग तज्ज्ञांनी आपण रुग्णांच्या उपचारासाठी नुकताच लाँच झालेला अ‍ॅप्पलचा iPhone 13 Pro Max वापरत असल्याचे सांगितले आहे.

Doctor uses iphone 13 pro max camera for patients eye treatment  | OMG! डोळ्यांचा उपचार करण्यासाठी डॉक्टर वापरतायत iPhone 13 Pro Max चा कॅमेरा  

OMG! डोळ्यांचा उपचार करण्यासाठी डॉक्टर वापरतायत iPhone 13 Pro Max चा कॅमेरा  

Next

अॅपल वॉच लोकांच्या आरोग्याची काळजी घेते. तसेच या स्मार्ट वॉचने अनेकदा लोकांचा जीव वाचवल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत. परंतु, यावेळी अ‍ॅप्पलच्या आयफोनबद्दल एक अजब बातमी समोर आली आहे. एक डॉक्टर आपल्या रुग्णांच्या डोळ्यांवर उपचार करण्यासाठी iPhone 13 Pro Max चा वापर करत आहे.  

iPhone 13 Pro Max चा उपचारासाठी वापर  

नेत्र रोग तज्ज्ञ (opthalmologist) डॉक्टर टॉमी कोर्न यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपण रुग्णांच्या उपचारासाठी नुकताच लाँच झालेला अ‍ॅप्पलचा iPhone 13 Pro Max वापरत असल्याचे सांगितले आहे. आयफोन 13 प्रो मॅक्सच्या कॅमेऱ्यातील मधील मॅक्रो मोडचा वापर करून डॉक्टर आपल्या रुग्णांच्या डोळ्यांचे फोटोज कॅप्चर करत आहेत. या फोटोजच्या माध्यमातून ते डोळ्यांचे स्वास्थ्य आणि आजारांचे निदान करू शकतात.  

डॉक्टरांनी आपल्या पोस्टमध्ये हा एक प्रयोग असल्याचे म्हटले आहे. तसेच या पद्धतीच्या वापरासाठी त्यांनी आपल्या रुग्णाणांकडून परवानगी देखील घेतली आहे. पोस्टमध्ये त्यांनी कॉर्निया ट्रान्सप्लांट झालेल्या रुग्णाचे उदाहरण दिले आहे. यासाठी Apple ने iPhone 13 Pro Max मध्ये मॅक्रो फोटोग्राफीसाठी दिलेल्या अल्ट्रा-वाईड कॅमेऱ्याचा वापर केला आहे. या फिचरच्या मदतीने एखाद्या छोट्या वस्तूचा दोन सेंटीमीटर अंतरावरून फोटो काढता येतो.  

iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max चे स्पेसिफिकेशन्स 

iPhone 13 सीरिजमध्ये जुन्या iPhone 12 Pro च्या तुलनेत छोटी नॉच देण्यात आली आहे. तसेच डिजाईनमध्ये देखील अनेक बदल करण्यात आले आहेत. Apple च्या सर्वात पॉवरफुल iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max मध्ये फरक फक्त आकाराचा आहे. iPhone 13 Pro मध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले मिळतो, तर iPhone 13 Pro Max मधील डिस्प्ले 6.7-इंचाचा आहे. हे दोन्ही मॉडेल कंपनीने Super Retina XDR डिस्प्ले पॅनलसह सादर केले आहेत. जे 1000 निट्सच्या मॅक्सिमम ब्राईटनेसला सपोर्ट करतात. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 10Hz-120Hz दरम्यान बदलत राहतो.   

प्रोसेसिंगसाठी यात अ‍ॅप्पलची A15 Bionic चिप देण्यात आली आहे. जी 5 नॅनोमीटर टेक्नॉलॉजीवर बनवण्यात आली आहे. यात दोन हाय परफॉर्मिंग कोर आणि चार हाय एफिशन्सी कोर मिळतात. आयफोन 13 मधील प्रो लाईनअपमध्ये 6 कोर असलेला जीपीयू मिळतो. याची बॅटरी लाईफ देखील सुधारण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max  मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात नव्या अल्ट्रा वाईड, वाईड आणि टेलीफोटो कॅमेऱ्याचा समावेश करण्यात आला आहे.   

Web Title: Doctor uses iphone 13 pro max camera for patients eye treatment 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.