फोन चार्जिंग करताना करु नका या 5 चुका, पडेल महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 03:44 PM2018-06-11T15:44:16+5:302018-06-11T15:44:16+5:30

काहीवेळा 6 महिन्यातच फोनची बॅटरी खराब होते. चला जाणून घेऊया अशाच 5 चुका ज्या तुम्ही फोन चार्जिंग करताना कधीही करु नये. 

Dont do these 5 things while charging smartphones | फोन चार्जिंग करताना करु नका या 5 चुका, पडेल महागात!

फोन चार्जिंग करताना करु नका या 5 चुका, पडेल महागात!

googlenewsNext

(Image Credit: www.fonepaw.com)

तुमच्यापैकी अनेकजण असे असतील ज्यांना त्यांची फोन चार्जिंग करण्याची सवय बदलण्याची गरज असेल. अनेकजण फोन चार्जिंग करताना काही चुका करतात आणि नंतर फोन खराब झाल्यावर त्यांना पश्चाताप होतो. या चुकांमुळे केवळ फोन नाहीतर फोनची बॅटरीही खराब होते. काहीवेळा 6 महिन्यातच फोनची बॅटरी खराब होते. चला जाणून घेऊया अशाच 5 चुका ज्या तुम्ही फोन चार्जिंग करताना कधीही करु नये. 

1) ओरिजीनल चार्जरनेच फोन चार्ज करा

अनेकजण आपला चार्जर न वापरता दुसऱ्या किंवा डुप्लिकेट चार्जरने फोन चार्ज करतात. पण हे चुकीचं आहे. कधीही तुमच्या फोनच्या ओरिजीनल चार्जरनेच फोन चार्ज करावा. याने फायदा हा होईल की, तुमच्या फोनची बॅटरी चांगली राहील. त्यासोबतच चार्जिंग पॉईंट खराब होणार नाही आणि फोन लगेच चार्ज होणार. 

2) फास्ट चार्जरला करा दूर

आजकाल बाजारात कितीतरी फास्ट चार्जर उपलब्ध आहेत. पण हे फास्ट चार्जर तुमच्या फोनसाठी कोणत्याही शत्रूपेक्षा कमी नाहीयेत. या चार्जरने तुमचा फोन कमी वेळात चार्ज तर होतो पण फोनची बॅटरी निकामी होते. 

3) फोन रात्रभर चार्जिंगला लावू नका

अनेकांना सवय असते की, ते रात्रभर फोन चार्जिंगला लावतात. पण मुळात कोणताही फोन चार्जिंग होण्यासाठी 2 ते 3 तास वेळ लागतो. जर तुम्हीही असे करत असाल तर यापुढे हे करु नका. असे केल्याने फोन गरम होतो आणि बॅटरीही खराब होते. 

4) पावर सेव्हर अॅपपासून दूर रहा

अनेकजण बॅटरी वाचवण्याचा दावा कऱणारे थर्ड पार्टी अॅप फोनमध्ये इन्स्टॉल करतात. पण या अॅपमुळे फोनचं नुकसान होतं. खरंतर असे अॅप फोनवर प्रेशर निर्माण करतात. त्यामुळे फोन हॅंग होऊ लागतो. 

5) 100 टक्के चार्जिंग करु नका

कधीही फोन 80 टक्क्यांपेक्षा जास्त चार्जिंग करु नका. कारण यामुळे बॅटरी गरम होऊ लागतो आणि बॅटरीचं लाईफ कमी होतं. 

Web Title: Dont do these 5 things while charging smartphones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.