Whatsapp वर असे व्हिडिओ पाठवल्यास खावी लागेल जेलची हवा! लगेच जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 10:06 PM2022-10-24T22:06:26+5:302022-10-24T22:08:36+5:30

आज आम्ही आपल्याला अशाच काही महत्वाच्या बाबींसंदर्भात माहिती देणार आहोत. ज्यामुळे आपल्यावर जेलची हवा खाण्याचीही वेळ येऊ शकते. जर आपल्याकडूनही चुकून अशी चूक झालीच, तर आपल्याला जेलमध्ये जाण्यापासून कुणीही वाचवू शकणार नाही.

dont share such videos on Whatsapp it may land you in jail | Whatsapp वर असे व्हिडिओ पाठवल्यास खावी लागेल जेलची हवा! लगेच जाणून घ्या

Whatsapp वर असे व्हिडिओ पाठवल्यास खावी लागेल जेलची हवा! लगेच जाणून घ्या

Next

सध्या Whatsapp हे मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक असल्यासारखेच बनले आहे. आपण सात्याने त्याचा वापर करत असतो. या अॅपच्या मदतीने आपण फोटो आणि व्हिडीओदेखील शेअर करत असतो. पण हे करताना काही वेळा आपल्याकडून कायद्यांचे उल्लंघनही होऊ शकते. आज आम्ही आपल्याला अशाच काही महत्वाच्या बाबींसंदर्भात माहिती देणार आहोत. ज्यामुळे आपल्यावर जेलची हवा खाण्याचीही वेळ येऊ शकते. जर आपल्याकडूनही चुकून अशी चूक झालीच, तर आपल्याला जेलमध्ये जाण्यापासून कुणीही वाचवू शकणार नाही.

आता आपण विचार करत असाल, की असा कोणता व्हिडिओ अथवा गोष्ट आहे, की जी पाठवल्यानंतर आपल्याला तुरुंगात जावे लागू शकते. दिल्ली पोलिसांनी गेल्या काही दिवसांपूर्वी काही लोकांना ताब्यात घेतले होते. या लोकांवर ते Child Pornography शी संबंधित असल्याचा आरोप होता. यावरून आपल्याला, कळलेच असले, की Child Pornography हा गुन्हा आहे. अर्थात असा कुठलाही व्हिडिओ अथवा फोटो शेअर केल्यास आपल्यालाही जेलची हवा खावी लागू शकते.

आपण अनेक वेळा कळत न कळत सामाजिक भेदभावाला प्रोत्साहन देणारे व्हिडिओही शेअर करून टाकतो. मात्र, यावेळी आपण विसून जातो, की असे व्हिडिओदेखील कायदेशीर गुन्ह्यांच्या कक्षेत येतात. असा व्हिडीओ जर आपल्या नजरेत पडला, तर तो कुठलाही विचार न करता ताबडतोब डिलीट करायला हवा. कारण एखादवेळा तो व्हिडिओही आपल्याला अडचणीत आणू शकतो. यामुळे आपण याची काळजी घेणे आवश्यक आहे. जरी असे करताना कुणी आढळून आले तर, त्याला थेट जेलची हवा खावी लागू शकते. 

याच बोरोबर, फेक न्यूज देखील आपल्याला जेलची हवा दाखवू शकते. जर आपणही असेच करत असाल तर आपल्याला सावध राहणे आवश्यक आहे. अर्थात कुठल्ही न्यूज शेअर करताना आपण ती क्रॉस चेक करायला हवा.

Web Title: dont share such videos on Whatsapp it may land you in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.