6,380mAh बॅटरीसह Doogee N40 Pro लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Published: July 15, 2021 11:47 AM2021-07-15T11:47:29+5:302021-07-15T11:48:20+5:30
Doogee N40 Pro स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर चालतो, हा फोन 26 जुलैपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल.
गेल्या महिन्यात दणकट Doogee S86 Pro लाँच केल्यानंतर कंपनीने आता Doogee N40 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये 6GB रॅम 20 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 6,380mAh बॅटरी असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. हा फोन 26 जुलैपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल.
Doogee N40 Pro ची किंमत
Doogee N40 Pro स्मार्टफोनची किंमत कंपनीने अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहे. परंतु हा फोन 26 जुलैपासून विकत घेता येईल. हा फोन AliExpress, Banggood आणि Lazada सारख्या वेबसाइटच्या माध्यमातून विकत घेता येईल. Doogee N40 Pro स्मार्टफोन मिडनाइट ब्लू, क्लासिक ब्लॅक, फॉरेस्ट ग्रीन आणि कॅरेमल ब्राउन अश्या चार रंगात उपलब्ध होईल.
Doogee N40 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Doogee N40 Pro स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, हा वॉटरड्रॉप डिस्प्ले 720×1600 पिक्सल रिजोल्यूशन आणि 20:9 अस्पेक्ट रेशियोसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी60 प्रोसेसरसह 6 जीबी रॅम आणि 128GB जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. Doogee N40 Pro स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर चालतो.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 20 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे, तसेच 8 मेगापिक्सलची वाईड-अँगल लेन्स, 8 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा चौथा सेन्सर मिळतो. हा फोन 16 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Doogee N40 Pro स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6,380 एमएएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 24 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यावर 1 ते 3 दिवस फोन वापरता येईल, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच हा फोन 15 दिवसांचा स्टॅण्डबाय टाइम देऊ शकतो.