भन्नाट! रात्रीच्या अंधारात देखील क्लियर फोटो घेणारा मोबाईल; येतोय दोन स्क्रीन असलेला 'हटके' Smartphone
By सिद्धेश जाधव | Published: February 22, 2022 03:11 PM2022-02-22T15:11:02+5:302022-02-22T15:12:28+5:30
दोन डिस्प्ले असलेली नवीन स्मार्टफोन सीरिज Doogee लाँच करणार आहे. यात मागच्या बाजूला वर्तुळाकार डिस्प्ले मिळेल.
Doogee कंपनी आपल्या हटके स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. अशीच एक अनोखी S98 Series लवकरच बाजारात येणार आहे. यात मीडियाटेकच्या नेक्स्ट जेनरेशन 6nm चिपचा वापर केला जाईल. तसेच यात दोन डिस्प्ले आणि नाईट व्हिजन कॅमेरा देखील देण्यात येईल. Doogee S98 सीरिजची माहिती टेक वेबसाईट GSMARENA नं सर्वप्रथम दिली आहे.
Doogee S98 सीरिज
Doogee S98 बद्दल खूप कमी माहिती उपलब्ध झाली आहे. रिपोर्टनुसार, या सीरिजमध्ये S98, S98 Pro, आणि S98 Ultra असे तीन मॉडेल सादर केले जाऊ शकतात. यातील बेस मॉडेल मार्चमध्ये ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. तर Pro आणि Ultra व्हेरिएंटसाठी एप्रिल आणि मे 2022 ची वाट बघावी लागू शकते. कंपनीचा इतिहास पाहता हे फोन्स अधिकृत वेबसाईटसह अलीएक्सप्रेसवरून जगभरात उपलब्ध होतील.
संभाव्य स्पेक्स आणि फीचर्स
Doogee S98 Pro किंवा S98 Ultra मध्ये मीडियाटेकच्या नव्या चिपसेटचा वापर केला जाऊ शकतो. तर वॅनिला S98 स्मार्टफोन 8GB रॅम, 256GB इंटरनल स्टोरेज आणि Helio G96 चिपसेटसह बाजारात येईल. यात 512GB पर्यंत मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट मिळेल. हा फोन Android 12 वर चालेल आणि यात तीन वर्षांपर्यंत सॉफ्टवेयर सपोर्ट आणि अपडेट मिळेल.
हटके कॅमेरा फीचर्स
Doogee S98 च्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात येईल. सोबत 20 मेगापिक्सलचा नाईट व्हिजन कॅमेरा मिळेल, जो अंधारात देखील क्लियर फोटो घेऊ शकेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल. Doogee S98 च्या किंमतीची माहिती मात्र अजून समोर आली नाही.
हे देखील वाचा:
- स्वदेशी कंपनीनं केली कमाल; 12 हजारांच्या आत शानदार Smart TV, 25 हजार मुव्हीज मोफत
- असा मिळवा OnePlus Nord CE 2 5G वर 1500 रुपयांचा डिस्काउंट; पहिल्याच सेलमध्ये करा स्वस्तात खरेदी