आता टेम्परेचर गनचे देखील काम करणार स्मार्टफोन! 8500mAh बॅटरी आणि बिल्टइन थर्मामीटरसह आला हा स्मार्टफोन 

By सिद्धेश जाधव | Published: August 20, 2021 01:06 PM2021-08-20T13:06:58+5:302021-08-20T13:13:15+5:30

DOOGEE V10 Dual 5G: DOOGEE च्या नवीन V10 Dual 5G नावाच्या रगेड स्मार्टफोनमध्ये कंपनीने 8500mAh ची बॅटरी, 8GB रॅम आणि 48MP कॅमेरा अश्या जबरदस्त फीचर्ससाथ मिल्ट्री ग्रेड बिल्ड दिली आहे.

DOOGEE V10 Dual 5G rugged smartphone with inbuilt infrared thermometer 8500mAh battery | आता टेम्परेचर गनचे देखील काम करणार स्मार्टफोन! 8500mAh बॅटरी आणि बिल्टइन थर्मामीटरसह आला हा स्मार्टफोन 

आता टेम्परेचर गनचे देखील काम करणार स्मार्टफोन! 8500mAh बॅटरी आणि बिल्टइन थर्मामीटरसह आला हा स्मार्टफोन 

Next
ठळक मुद्देप्रोसेसिंगसाठी हा या फोनमध्ये मीडियाटेकचा डायमनसिटी 700 चिपसेट मिळतो.DOOGEE V10 Dual 5G फोनमध्ये इनबिल्ट थर्मामीटर 0.2°C पर्यंतच्या फरकासह तापमान सांगू शकतो. बॅटरी 4 दिवसांचा बॅकअप देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे.

DOOGEE स्मार्टफोन कंपनी आपल्या दणकट, मिल्ट्री ग्रेड स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. याआधी कंपनीने अनेक हटके स्मार्टफोन बाजारात सादर केले आहेत. आता कंपनीने त्यापुढे जात आपला नवीन स्मार्टफोन बिल्ट इन Infrared Thermometer सह सादर केला आहे. DOOGEE च्या नवीन V10 Dual 5G नावाच्या रगेड स्मार्टफोनमध्ये कंपनीने 8500mAh ची बॅटरी, 8GB रॅम आणि 48MP कॅमेरा अश्या जबरदस्त फीचर्ससाथ मिल्ट्री ग्रेड बिल्ड दिली आहे. या फोनची किंमत $299.99 म्हणजे 22,500 रुपयांच्या आसपास आहे. 

DOOGEE V10 Dual 5G चे स्पेसिफिकेशन्स 

या स्मार्टफोनमध्ये 6.39-इंचाचा डिस्प्ले 720x2560 पिक्सल रिजोल्यूशनसह दिला आहे. प्रोसेसिंगसाठी हा या फोनमध्ये मीडियाटेकचा डायमनसिटी 700 चिपसेट मिळतो. अँड्रॉइड 11 आधारित हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. या फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48MP चा मुख्य सेन्सर, 8MP चा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP ची मॅक्रो लेन्स मिळते. हा फोन 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.  हे देखील वाचा: जबरदस्त! या स्मार्टफोनवर टिकणार नाही बॅक्टेरिया; अँटी-बॅक्टेरियल कोटिंगसह Ulefone Armor 12 Dual 5G लाँच

Infrared Thermometer आणि इतर फीचर्स  

DOOGEE V10 Dual 5G फोनमध्ये इनबिल्ट थर्मामीटर 0.2°C पर्यंतच्या फरकासह तापमान सांगू शकतो. फक्त मानवी शरीर नव्हे तर आजूबाजूच्या वस्तूंचे तापमान देखील यातून मोजता येईल. वर सांगितल्याप्रमाणे या फोनमध्ये 8500mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 4 दिवसांचा बॅकअप देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंग आणि 10W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच रिवर्स चार्जिंग फीचरमुळे या फोनचा वापर पावर बँक प्रमाणे करता येईल.  हे देखील वाचा: विवोचा नवीन स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच; 5000mAh बॅटरी, 5GB रॅमसह Vivo Y21 बाजारात दाखल

DOOGEE V10 Dual 5G हा एक रगेड स्मार्टफोन आहे. जो MIL-STD-810G मिल्ट्री ग्रेड सर्टिफिकेशनसह सादर करण्यात आला आहे. म्हणजे हा स्मार्टफोन उंचावरून पडल्यावर देखील सुस्थिती राहील. तसेच हा फोन IP68 आणि IP69K रेटिंगसह आला आहे, हा फोन Water-proof, Dust-proof, Shock-proof आणि Drop-proof आहे. 

Web Title: DOOGEE V10 Dual 5G rugged smartphone with inbuilt infrared thermometer 8500mAh battery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.