सरकारचा नवा प्लॅन! Jio, Airtel आणि Vi ची होणार सुट्टी! इंटरनेटशिवाय पाहू शकता Netflix, Prime Video 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 08:25 AM2022-11-10T08:25:32+5:302022-11-10T08:27:47+5:30

D2M : सध्या 82 टक्के इंटरनेट ट्रॅफिक व्हिडिओशी संबंधित आहे. भारतात प्रत्येक मिनिटाला सुमारे 1.1 मिलियन मिनिटांचे व्हिडिओ स्ट्रिमिंग किंवा डाउनलोड केले जातात.

Dot D2m Plan For Direct Broadcast Ott Service Like Netflix Prime Video On Smartphone To Bypass Jio Airtel Vi | सरकारचा नवा प्लॅन! Jio, Airtel आणि Vi ची होणार सुट्टी! इंटरनेटशिवाय पाहू शकता Netflix, Prime Video 

सरकारचा नवा प्लॅन! Jio, Airtel आणि Vi ची होणार सुट्टी! इंटरनेटशिवाय पाहू शकता Netflix, Prime Video 

googlenewsNext

नवी दिल्ली : दूरसंचार विभाग (DoT)एका नव्या 'डायरेक्ट टू मोबाईल' (D2M) टेक्नॉलॉजीवर काम करत आहे. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने इंटरनेटशिवाय व्हिडिओ ऑनलाइन पाहता येणार असल्याचा दावा केला जात आहे. म्हणजेच मोबाईल फोनला एफएम (FM) सारखे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसारख्या नेटफ्लिक्स (Netflix), अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime) सारख्या OTT प्लॅटफॉर्मशी इंटरनेटशिवाय थेट कनेक्ट केला जाऊ शकेल. यासाठी इंटरनेटची गरज भासणार नाही. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया..

कशी काम करेल D2M टेक्नॉलॉजी?
खरंतर, व्हिडिओ आणि इतर इंटरनेट सेवा दूरसंचार विभागाद्वारे निश्चित स्पेक्ट्रम बँडवर जोडल्या जातील. प्रसार भारतीने 'डायरेक्ट-टू-मोबाइल' (D2M) टेक्नॉलॉजीच्या चाचणीसाठी गेल्या वर्षी IIT कानपूरसोबत भागीदारी केली होती. यामध्ये 526-582 मेगाहर्ट्झ बँडचा वापर केला जाऊ शकतो. दूरसंचार विभागाने यासाठी एक समिती स्थापन केली आहे.

Jio, Airtel आणि Vi ची सुट्टी होणार का?
अशा परिस्थितीत D2M टेक्नॉलॉजी आल्यानंतर रिलायन्स जिओ (Reliance Jio), भारती एअरटेल (Bharti Airtel) आणि व्ही (Vi) सारख्या दूरसंचार कंपन्यांची सुट्टी होणार का? असा प्रश्न उपस्थित होते आहे. मात्र, जिओ, एअरटेल आणि व्ही सारख्या टेलिकॉम कंपन्यांना पूर्णपणे बंद होणार नाहीत. पण, ऑनलाइन व्हिडिओ पाहण्यासाठी  जिओ, एअरटेल आणि व्ही वरील निर्भरता काही प्रमाणात कमी होईल.

व्हिडिओ पाहण्यात भारत अव्वल
सध्या 82 टक्के इंटरनेट ट्रॅफिक व्हिडिओशी संबंधित आहे. भारतात प्रत्येक मिनिटाला सुमारे 1.1 मिलियन मिनिटांचे व्हिडिओ स्ट्रिमिंग किंवा डाउनलोड केले जातात. दर महिन्याला अंदाजे 240 टेक्साबाइट डेटा वापरला जातो.

काय होईल फायदा?
कन्व्हर्ज्ड डायरेक्ट-टू-मोबाइल (D2M) नेटवर्कच्या मदतीमुळे बफरिंगशिवाय अनलिमिटेड व्हिडिओ पाहता येतील. यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग आणि दिशा बदलेल. D2M नेटवर्कमध्ये, ब्रॉडकास्टर्स अशा डेटा पाईप्सचा वापर करू शकतात आणि पारंपारिक टीव्हीपेक्षा बरेच अॅप्लिकेशन डिलिव्हर करता येऊ शकते. डायरेक्ट-टू-मोबाइल आणि 5G ब्रॉडबँडमधील समन्वय भारतातील ब्रॉडबँडचा वापर आणि स्पेक्ट्रमच्या उपयोगात सुधारणा होईल.

Web Title: Dot D2m Plan For Direct Broadcast Ott Service Like Netflix Prime Video On Smartphone To Bypass Jio Airtel Vi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.