5 वर्षे जुना फोन बंद होणार, सरकारची नवी मोबाईल स्क्रॅप पॉलिसी?, जाणून घ्या 'सत्य'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 01:26 PM2024-01-24T13:26:56+5:302024-01-24T13:36:25+5:30
सोशल मीडियावर विशेषतः इन्स्टाग्रामवर असा दावा सध्या मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
सरकारने 10 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी स्क्रॅपिंग पॉलिसी लागू केली आहे. म्हणजे जुनी वाहनं स्क्रॅप करणं बंधनकारक असेल. त्याच धर्तीवर मोबाईल स्क्रॅपिंग पॉलिसी राबविण्यात येत आहे. यामध्ये तुमच्या पाच वर्ष जुन्या फोनच्या वापरावर बंदी घालण्यात येणार आहे. याचं कारण म्हणजे सरकारने ठरवलेला स्पेशिफिक एब्जॉर्ब्प्शन रेट म्हणजेच SAR व्हॅल्यू. सोशल मीडियावर विशेषतः इन्स्टाग्रामवर असा दावा सध्या मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे.
सरकारने आधीच SAR व्हॅल्यूचे स्टँडर्ड निश्चित केले आहेत, जे प्रत्येक स्मार्टफोन कंपनीने पाळले पाहिजेत. याशिवाय, स्मार्टफोन बॉक्सवर SAR व्हॅल्यूबाबतचा तपशीलही नोंदवला जातो. दूरसंचार विभागाच्या हवाल्याने हा दावा करण्यात येत आहे. मात्र, 5 वर्षे जुने फोन बंद करण्याचा कोणताही आदेश दूरसंचार विभागाकडून जारी करण्यात आलेला नाही. तुम्ही तुम्हाला हवी तितकी वर्षे तुमचा स्मार्टफोन वापरू शकता.
नवा नियम नाही
मोबाईल फोनमधून किती रेडिएशन निघतात? हे SAR व्हॅल्यूद्वारे निर्धारित केले जाते. प्रत्येक डिव्हाइससाठी वेगवेगळी SAR व्हॅल्यूज निश्चित केली गेली आहे. सामान्यतः असं मानलं जातं की कोणत्याही उपकरणाची SAR मूल्य 1.6 W/Kg पेक्षा जास्त नसावी. हा काही नवीन नियम नाही. भारत सरकारने 1 सप्टेंबर 2013 रोजी लागू केला आहे.
SAR व्हॅल्यू कशी चेक करायची?
फोनच्या बॉक्सवर कोणत्याही डिव्हाईसची SAR व्हॅल्यू दिली जाते. पण जर तुमच्याकडे बॉक्स नसेल, तर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर *#07# डायल करावं लागेल. अशा प्रकारे तुम्हाला SAR व्हॅल्यूचे डिटेल्स मिळतील.