बापरे! 'या' नंबरवरून फोन आल्यास वेळीच व्हा सावध; करू नका 'ही' चूक अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 02:24 PM2021-08-07T14:24:51+5:302021-08-07T14:28:16+5:30
Dots alerts mobile users : ईमेल, ओटीपी आणि एसएमएसद्वारे फ्रॉडच्या घटना वाढत असताना हॅकर्स आता आंतरराष्ट्रीय कॉलच्या नावाने देखील फसवणूक करत आहेत.
नवी दिल्ली - सध्या स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र याचा जसा फायदा आहे. तसा तोटा देखील आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून हल्ली लोकांची फसवणूक केली जात आहे. नवनवीन पद्धतीने लोकांना जाळ्यात अडकवलं जात आहे. ईमेल, ओटीपी आणि एसएमएसद्वारे फ्रॉडच्या घटना वाढत असताना हॅकर्स आता आंतरराष्ट्रीय कॉलच्या नावाने देखील फसवणूक करत आहेत. सरकारकडून सातत्याने अलर्ट केले जात असले तरी अनेकजणांना यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागते.
दूरसंचार विभागाने (DoT) देखील सर्व मोबाईल युजर्सला मेसेज पाठवून या प्रकारच्या फ्रॉडपासून वाचण्याचा सल्ला दिला आहे. DoT द्वारे अनेक युजर्सला मेसेज पाठवून आंतरराष्ट्रीय कॉलपासून सावध राहण्यास सांगितले आहे. या मेसेजमध्ये तुमच्या फोनवर कोणत्याही नंबरशिवाय अथवा भारतीय नंबरवरून आंतरराष्ट्रीय कॉल आल्यास DoT चा टोल फ्री क्रमांक 1800110420/1963 वर त्वरित संपर्क करा. जर तुमच्या मोबाइलवर फोन येत असेल व नंबर दिसत नसेल तर तो फ्रॉड कॉल असू शकतो. DoT नुसार, असा फोन आल्यास त्वरित माहिती द्यावी. हे स्कॅम कॉल असतात व यापासून सावध राहायला हवे.
धक्कादायक! सिम व्हेरिफिकेशनच्या नावाने डॉक्टरची मोठी फसवणूक; वेळीच व्हा सावध#crime#crimesnews#Policehttps://t.co/t22M63JQUO
— Lokmat (@MiLOKMAT) August 3, 2021
जिओ, वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल या टेलिकॉम कंपन्या देखील नागरिकांना मेसेज पाठवून सावध करत असतात. आंतरराष्ट्रीय कॉल फ्रॉडबद्दल सांगायचे तर यूजर्सला वेगवेगळ्या कंट्री कोडद्वारे फोन येऊ शकतात. यामध्ये +92, +375 इत्यादी कोडवरून कॉल येऊ शकतात. या कॉल्सला रिसिव्ह केल्यावर लॉटरी अथवा बक्षीस जिंकल्याचे सांगितल जाते. तसेच कॉल केल्यानंतर तुमची खासगी माहिती विचारली जाते व बक्षीस घेण्यासाठी कमिशन मागितले जाते. अशाप्रकारची फसवणूक फक्त कॉलच नाही तर एसएमएसद्वारे देखील केली जाते. त्यामुळे दूरसंचार विभाग आणि टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना सातत्याने सावध करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बापरे! सिम व्हेरिफिकेशनसाठी 11 रुपये मागितले अन् खात्यातून 6 लाख गायब केले; असा घातला जातोय गंडा
मध्य प्रदेशच्या रीवामध्ये सिम व्हेरिफेकशनच्या नावाने एका डॉक्टरची फसवणूक करण्यात आली आहे. फक्त 11 रुपयांच्या नावाने एका डॉक्टरच्या खात्यातून फ्रॉड करणाऱ्यांनी 6 लाखांच्या रक्कमेवर डल्ला मारला आहे. हा भयंकर प्रकार लक्षात येताच डॉक्टरने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे. एका डॉक्टरला सिम व्हेरिफिकेशनच्या नावाने तब्बल सहा लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. सायबर क्रिमिनल्सने रिटायर्ड डॉक्टर अंबिका प्रसाद द्विवेदी यांवर निशाणा साधून त्यांची मोठी फसवणूक केली आहे. 18 जुलै रोजी फ्रॉड करणाऱ्यांनी डॉक्टरांना कॉल करुन त्यांचं सिम कार्ड व्हेरिफाय करण्याबाबत माहिती दिली. सिम कार्ड व्हेरिफाय न केल्यास, 24 तासांच्या आतमध्ये सिम बंद होणार असल्याची खोटी माहिती त्यांना दिली. तसेच सिम व्हेरिफिकेशनच्या नावाखाली 11 रुपये नेट बँकिंगद्वारे मागितले. डॉक्टरांनी जाळ्यात अडकून आपल्या SBI खात्यातून 11 रुपये ट्रान्सफर केले. पैसे ट्रान्सफर केल्याच्या काही वेळातच डॉक्टरांच्या मोबाईलवर एका मागोमाग एक पैसे कट झाल्याचे 15 मेसेज आले. या मेसेजमधून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 6 लाख 423 रुपये उडाल्याचं समजलं.