गुगल मॅपने वळणाचा अंदाज चुकवला; पुलावरून कारसह थेट पाइपलाईनवर कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 08:12 PM2020-01-08T20:12:32+5:302020-01-08T20:25:24+5:30

पाच जण गंभीर जखमी 

Driving under the guidance of Google Maps; car fall from bridge and crashed into the pipeline | गुगल मॅपने वळणाचा अंदाज चुकवला; पुलावरून कारसह थेट पाइपलाईनवर कोसळला

गुगल मॅपने वळणाचा अंदाज चुकवला; पुलावरून कारसह थेट पाइपलाईनवर कोसळला

Next
ठळक मुद्देअपघाताप्रकरणी कोणतीही नोंद अजूनही पोलीस ठाण्यात झाली नाही.पाच जण जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भिवंडी : तालुक्यातील खंबाळा येथे गुगल मॅपच्या नादात पुलावरून कार थेट पाइपलाईनवर कोसळल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली आहे.

यामध्ये पाच जण जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे पाचही जण गुजरातचे राहणारे असून ते भिवंडी  तालुक्यातील लाप गावच्या हद्दीतील फिल्मसिटी पाहण्यासाठी येत असताना त्यांनी गुगल मॅप लावून त्यानुसार आपली कार घेऊन निघाले होते. त्यावेळी ते खंबाळा - कुंदे रोडवरील पुलावरून वळण घेताना मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा पाईप लाईनवर त्यांची कार कोसळली.

बाबो...तासाला 225 कोटी रुपयांपर्यंत कमवितात या जगविख्यात कंपन्या

गुगल मॅपवर विश्वास ठेवणारा भक्त अक्कलकोट परिसरात भरकटतोय

'गुगल'वर अजूनही देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!

त्यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. मात्र, या अपघाताप्रकरणी स्थानिक पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याने जखमींची नावे समजू शकली नाहीत. मात्र, पहाटेच्या सुमारास गाडी चालवितांना गुगल मॅपवरील रस्ता व पुलावरील वळणाचा अंदाज आला नसल्याने गाडी थेट पुलाच्या खाली असलेल्या पाईप लाईनवर कोसळल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. 


तर या अपघाताप्रकरणी कोणतीही नोंद अजूनही पोलीस ठाण्यात झाली नसल्याने या अपघाताविषयी नेमकी माहिती देऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी दिली आहे.

Web Title: Driving under the guidance of Google Maps; car fall from bridge and crashed into the pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.