Blackview: पाण्यात बुडाला, जमिनीवर पडला तरी तुटणार नाही हा स्मार्टफोन, असे आहेत जबरदस्त फिचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 12:35 PM2022-05-31T12:35:50+5:302022-05-31T12:36:24+5:30
Blackview Mobile: - ब्लॅकव्यूचे दोन रफ अँड टफ स्मार्टफोन ग्लोबल मार्केटसाठी लॉन्च केले गेले आहेत. Blackview BL8800 आणि Blackview BL8800 Pro 8,380mAh क्षमता असलेल्या मोठ्या बॅटरीसह इतर अनेक वैशिष्ट्ये आहेत.
नवी दिल्ली - ब्लॅकव्यूचे दोन रफ अँड टफ स्मार्टफोन ग्लोबल मार्केटसाठी लॉन्च केले गेले आहेत. Blackview BL8800 आणि Blackview BL8800 Pro 8,380mAh क्षमता असलेल्या मोठ्या बॅटरीसह इतर अनेक वैशिष्ट्ये आहेत. दोन Blackview rugged smartphones आपल्या मुख्य कॅमेऱ्यांना सोडून इतर समान वैशिष्ट्यांना सपोर्ट करतात. दोन फोनमध्ये ६.५८ इंचांचा डिस्प्ले, ८२८०mAh ची दमदार बॅटरी आणि जबरदस्त कॅमेरा आहे. आज जाणून घेऊयात Blackview BL8800 आणि Blackview BL8800 Pro ची किंमत आणि फिचर्स.
Blackview BL8800 मध्ये नाईट व्हिजन कॅमेरा आहे. तर Blackview BL8800 Pro FLIR थर्मल इमेजिंग कॅमेऱ्यासह येतो. हा स्मार्टफोन काही आठवड्यांपूर्वी लॉन्च केला होता. आता तो ग्लोबली उपलब्ध आहे. अर्ली बर्ड डिस्काऊंट ऑफर आता बंद आहे. स्टँडर्ड मॉडेलची प्राथमिक किंमत ३५० डॉलर (सुमारे २७ हजार रुपये) आणि ४३० डॉलर ३३ हजार रुपयांदरम्या आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि अन्य आउटलेट्सच्या माध्यमातून हे कॅमेरे उपलब्ध आहेत.
या डिव्हाईसमध्ये मीडियाटेक डायमेन्शन ७०० चिपसेटशिवाय त्यामध्ये ८जीबी/१२८जीबी रॅम/ स्टोरेज कॉन्फिगरेशन देतात. फोनमध्ये आयपी६८, आयपी६९के आणि एमआयएल-एसटीडी-८१० रेटिंगचा समावेश आहे. दोन्ही उपकरणांमध्ये ८२८०mAh ची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर ३३डब्ल्यू फास्ट चार्जिंग आणि विस्तारित उपयोगास बॅकअप देते. तसेच उष्मा प्रतिबंधासाठी स्मार्टफोन ३डी कॉपर पाईप लिक्विड कुलिंग तंत्राचा उपयोग करतात.
Blackview च्या दोन्ही फोनमध्ये ६.५८ इंचांच्या 1,080 x 2,408px स्क्रीनमध्ये ४८० निट्स ब्राईटनेस आहे. दोन्ही मॉडेल तीन रंगांच्या कॉन्क्वेट ब्लॅक, मेचा ऑरेंज आणि नेव्ही ग्रिनमध्ये उपलद्ध आहेत.