मोबाईल सिम कार्डप्रमाणेच डीटीएच सेवाही पोर्ट करता येणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 01:47 PM2019-01-30T13:47:08+5:302019-01-30T13:47:31+5:30

ट्रायच्या अध्यक्षांनी याबाबतचा खुलासा केला आहे. ट्राय डीटीएच सेवा पुरवठादारांमध्ये अंतर्गत जोडणी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

DTH services can be ported as per mobile SIM card ... | मोबाईल सिम कार्डप्रमाणेच डीटीएच सेवाही पोर्ट करता येणार...

मोबाईल सिम कार्डप्रमाणेच डीटीएच सेवाही पोर्ट करता येणार...

googlenewsNext

नवी दिल्ली : मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या सेवेवर नाखुश असल्यास कंपनी बदलण्याची मुभा देण्यात आली होती. याचा अनेकजणांनी लाभ घेतला. आता डीटीएच सेवा देणाऱ्या कंपन्याही तोच सेट टॉपबॉक्स ठेवून बदलता येणार आहेत. TRAI याबाबत डीटीएच पोर्टींगची नवी योजना आणत आहे. 


ट्रायच्या अध्यक्षांनी याबाबतचा खुलासा केला आहे. ट्राय डीटीएच सेवा पुरवठादारांमध्ये अंतर्गत जोडणी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. ही योजना हे वर्ष संपेपर्यंत लागू करण्यात येणार आहे. यानुसार ग्राहक सेटटॉप बॉक्स न बदलताच कंपन्यांची सेवा बदलू शकणार आहेत. यासाठी ग्राहकांना त्यांच्या सेट टॉप बॉक्समध्ये नवीन सॉफ्टवेअर अपडेट करावे लागणार आहे. 


मात्र, यामुळे नेटवर्क बदलणे जरी सोपे होणार असले तरीही एसटीबीची सुरक्षा धोक्यात येण्य़ाची शक्यता आहे. यामुळे कंटेंटची नक्कल केली जाऊ शकते. ट्रायनुसार एसटीबीला प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर सारखे विकावे लागणार आहे. हे डीटीएच कंपन्यांना फारसे रुचणारे नसले तरीही ग्राहक त्यांच्या फायद्यानुसार कंपन्या बदलू शकणार आहेत. यामुळे कंपन्यांनाही चांगल्या ऑफर्स द्याव्या लागणार आहेत. 


तरीही ट्रायसमोर एक समस्या असणार आहे. ज्यांच्याकडे जुने एसटीबी आहेत त्यांमध्ये नवीन सेवा कशी देणार हा प्रश्न उभा ठाकणार आहे.

Web Title: DTH services can be ported as per mobile SIM card ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.