ड्युअल कॅमेरायुक्त पॅनासोनिक एल्युगा रे ५००
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 09:30 AM2017-09-18T09:30:33+5:302017-09-18T09:31:00+5:30
पॅनासोनिक कंपनीने ड्युअल कॅमेरा असणारा एल्युगा रे ५०० हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याचे संकेत दिले आहे.
पॅनासोनिक एल्युगा रे ५०० या मॉडेलचे मूल्य ८९९९ रूपये असून हा स्मार्टफोन ग्राहकांना फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे. कंपनीने अधिकृतपणे याला लाँच केले नसले तरी फ्लिपकार्टवर याची लिस्टींग करण्यात आली आहे. यातून याच्या मूल्यासह अन्य सर्व फिचर्सची माहिती समोर आली आहे. या लिस्टींगनुसार पॅनासोनिक एल्युगा रे ५०० हे मॉडेल अनेक उत्तमोत्तम फिचर्सनी सज्ज असणारा किफायतशीर मूल्याचा स्मार्टफोन असेल. याची खासियत म्हणजे या मॉडेलमध्ये ड्युअल कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस ५पी लेन्सयुक्त १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. यात एफ/२.० अपार्चर आणि ड्युअल एलईडी फ्लॅशची सुविधा देण्यात आली आहे. तर याच्या मागील बाजूस असणारा दुसरा कॅमेरा ६पी लेन्स आणि एफ/२.४ अपार्चरयुक्त ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. या दोन्ही कॅमेर्यांनी अतिशय उत्तम दर्जाच्या प्रतिमा काढता येतील असे कंपनीने नमूद केले आहे. या कॅमेर्यात एचडीआर, पॅनोरॅमीक, ब्युटी, वाईड अँगल कॅप्चर आणि नॉर्मल कॅप्चर आदी विविध मोडस् प्रदान करण्यात आले आहेत. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मॉडेलमध्ये ३पी लेन्स आणि एफ/२.४ अपार्चरयुक्त ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल.
पॅनासोनिक एल्युगा रे ५०० या मॉडेलमध्ये तब्बल ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची जंबो बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. मल्टी-टास्कींग करूनही ही बॅटरी दीर्घ काळापर्यंत टिकत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ७.१ नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल. उर्वरित फिचर्सचा विचार करता, यात ५ इंच आकारमानाचा आणि एचडी (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा २.५ डी ग्लासयुक्त आयपीएस ऑनसेल डिस्प्ले असेल. क्वाड-कोअर मीडियाटेक एमटी६७३७ प्रोसेसरने सज्ज असणार्या या मॉडेलची रॅम तीन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. पॅनासोनिक एल्युगा रे ५०० या स्मार्टफोनमध्ये हायब्रीड ड्युअल सीमकार्डची सुविधा असेल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या बिग बिलीयन डे या सेलमध्ये २१ सप्टेबरपासून विक्रीस उपलब्ध होणार आहे.