ड्युअल कॅमेरा सेटअप व फुल व्ह्यू डिस्प्लेयुक्त बजेट स्मार्टफोन

By शेखर पाटील | Published: August 14, 2018 08:26 PM2018-08-14T20:26:57+5:302018-08-14T20:27:21+5:30

टेक्नो मोबाईल्स कंपनीने फुल व्ह्यू डिस्प्ले आणि उत्तम दर्जाच्या कॅमेर्‍याने सज्ज असणारा कॅमोन आय स्काय २ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे.

Dual camera setup and full view display budget smartphone | ड्युअल कॅमेरा सेटअप व फुल व्ह्यू डिस्प्लेयुक्त बजेट स्मार्टफोन

ड्युअल कॅमेरा सेटअप व फुल व्ह्यू डिस्प्लेयुक्त बजेट स्मार्टफोन

googlenewsNext

टेक्नो मोबाईल्स कंपनीने फुल व्ह्यू डिस्प्ले आणि उत्तम दर्जाच्या कॅमेर्‍याने सज्ज असणारा कॅमोन आय स्काय २ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे.

टेक्नो मोबाईल्स हा ट्रान्ससिऑनच्या मालकीचा ब्रँड आहे. अलीकडेच त्यांनी भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केले असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच या कंपनीने कॅमोन आय स्काय हे मॉडेल लाँच केले होते. याचीच पुढील आवृत्ती कॅमोन आय स्काय २ या स्मार्टफोनच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे यात फुल व्ह्यू या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले ५.५ इंच आकारनाचा आणि एचडी प्लस म्हणजे १४४० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा असणारा आहे. याचे अस्पेक्ट रेशो १८:९ असा आहे. यात अलीकडच्या काळातील बहुतांश उच्च श्रेणीतील मॉडेल्समध्ये असणारा नॉच दिलेला नसल्याचे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. तथापि, हा डिस्प्ले या स्मार्टफोनचा सेलींग पॉइंट ठरू शकतो.

उर्वरित फिचर्समध्ये, टेक्नो कॅमोन आय स्काय २ या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा एमटी६७३९डब्ल्यूडब्ल्यू हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यातील मुख्य कॅमेरा हा एफ/२.० अपर्चरयुक्त असून १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. तर यातील दुसरा कॅमेरा व्हिजीए क्षमतेचा असणार आहे. अर्थात यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा हा एफ/२.० अपर्चरयुक्त व ८ मेगापिक्सल्सचा आहे. या दोन्ही कॅमेर्‍यांमध्ये आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स म्हणजेच कृत्रीम बुध्दीमत्तेचा सपोर्ट देण्यात आलेला आहे. याच्या मदतीने हे मॉडेल उत्तम दर्जाच्या प्रतिमा घेण्यास सक्षम असून यात इमेजची गुणवत्ता वाढविणारे अनेक फिचर्स व फिल्टर्स देण्यात आलेले आहेत. यात फेस अनलॉक हे फिचरदेखील असणार आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा हायओएस या युजर इंटरफेस देण्यात आलेला आहे. तर यातील बॅटरी ३०५० मिलीअँपिअर क्षमतेची देण्यात आलेली आहे.

 

टेक्नो कॅमोन आय स्काय २ मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील दिलेले आहेत. हा स्मार्टफोन ७,४९९ रूपये मूल्यात २० ऑगस्टपासून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. यासोबत रिलायन्स जिओची कॅशबॅक ऑफर लागू करण्यात आली आहे. यात ग्राहकांना एकंदरीत २२०० रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. तसेच यासोबत कंपनीने वन टाईम स्क्रीन रिप्लेसमेंट,  १०० दिवसांची रिप्लेसमेंट वॉरंटी देण्याचे जाहीर केले आहे.

Web Title: Dual camera setup and full view display budget smartphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.