ड्युअल कॅमेरा असलेला Vivo X20 आणि Vivo X20 Plus स्मार्टफोन लॉंच, जाणून घ्या फिचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 03:01 PM2017-09-22T15:01:55+5:302017-09-22T15:05:28+5:30

चीनची स्मार्टफोन मोबाइल कंपनी असलेल्या विवोने दोन नवीन स्मार्टफोन बाजारात आणले आहे. कंपनीने आज विवो X20 आणि X20 पल्स स्मार्टफोन लॉंच केले. या स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे  29,600 आणि 34,500 रुपये अशी आहे.

Dual Camera Vivo X20 and Vivo X20 Plus Smartphone Launch, Learn FEATURES ... | ड्युअल कॅमेरा असलेला Vivo X20 आणि Vivo X20 Plus स्मार्टफोन लॉंच, जाणून घ्या फिचर्स...

ड्युअल कॅमेरा असलेला Vivo X20 आणि Vivo X20 Plus स्मार्टफोन लॉंच, जाणून घ्या फिचर्स...

Next
ठळक मुद्देविवो X20 आणि X20 पल्स स्मार्टफोन लॉंचकिंमत अनुक्रमे  29,600 आणि 34,500 रुपयेप्री-ऑर्डर 25 सप्टेंबरपासून सुरु होणार

नवी दिल्ली, दि. 22 - चीनची स्मार्टफोन मोबाइल कंपनी असलेल्या विवोने दोन नवीन स्मार्टफोन बाजारात आणले आहे. कंपनीने आज विवो X20 आणि X20 पल्स स्मार्टफोन लॉंच केले. या स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे  29,600 आणि 34,500 रुपये अशी आहे. या स्मार्टफोनची प्री-ऑर्डर 25 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. सध्या या दोन्ही स्मार्टफोनची विक्री चीनच्या बाजारात सुरु आहे.    
अलीकडे काही कंपन्या सेल्फी केंद्रीत स्मार्टफोनला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत असून यामध्ये विवो कंपनी आघाडीवर आहे. या अनुषंगाने विवो कंपनीने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी 24 मेगापिक्सल क्षमतेचा फ्रंट कॅमेरा असणारा विवो व्ही 7 प्लस हा स्मार्टफोन आणला आहे. या स्मार्टफोनची किंमत लॉचिंगच्यावेळी 21, 990 रुपये इतकी होती. सध्या  विवो X20 आणि X20 पल्स स्मार्टफोन चीनमध्ये आणण्यात आले आहेत. मात्र, काही दिवसांत भारतीय बाजारपेठेत सुद्धा  दाखल होणार आहेत. 
विवो X20 आणि X20 पल्स स्मार्टफोनमध्ये अधिक फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच, दोन्ही स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असून हायलाईट आहे. तसेच,  f/1.8 अपार्चरयुक्त 12 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि रिअर कॅमेरा 5 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. तसेच, या दोन्ही स्मार्टफोनला फुल व्यू स्क्रीन आहे. विवो X20 स्मार्टफोन 6.1 इंचाचा आणि विवो X20 प्लस स्मार्टफोनला 6.43 इंचाची स्क्रीन आहे. त्याची रिझॉल्यूशन 1080×2160 पिक्सल आहे. याचबरोबर, दोन्ही स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिमसह अॅन्ड्राईड 7.1 नॉगट ऑपरेटिंग सिस्टिम आहे. तसेच, प्रोसेसर ऑक्टाकोर (2.2GHz+1.8GHz) दिला आहे. तर, Snapdragon 660 चिपसेटसह 4 जीबी रॅम दिली आहे. इनबिल्ट स्टोअरेज 64 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 256 जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. मात्र दोन्ही या स्मार्टफोन बॅटरीची क्षमता वेगवेगळी देण्यात आली आहे. विवो X20 स्मार्टफोनमध्ये 3245mAh आणि विवो X20 प्लसमध्ये 3905mAh इतक्या क्षमतेची आहे. याशिवाय दोन्ही स्मार्टफोनमध्ये फोर-जी नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टयुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स आहेत. 
 

Web Title: Dual Camera Vivo X20 and Vivo X20 Plus Smartphone Launch, Learn FEATURES ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल