लयभारी! पडला तरी तुटणार नाही Motorola Defy; बर्फात देखील वापरता येईल हा दणकट स्मार्टफोन
By सिद्धेश जाधव | Published: June 18, 2021 11:45 AM2021-06-18T11:45:00+5:302021-06-18T11:47:03+5:30
Motorola Defy Launch: Motorola ने 2012 नंतर rugged श्रेणीत Motorola Defy नावाचा दणकट स्मार्टफोन लाँच केला आहे. 1.8 मीटर पर्यंतच्या उंचीवरून पडूनही Motorola Defy ला बाहेरून किंवा आतून कोणतेही नुकसान होणार नाही.
Motorola एका Rugged SmartPhone वर काम करत आहे, अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. त्यानुसार इंग्लंडमधील Bullitt Group ने बनवलेला हा पावरफुल स्मार्टफोन Motorola Defy नावाने लाँच झाला आहे. यापूर्वी 2012 मध्ये या सीरिजचा फोन मोटोरोलाने लाँच केला होता. कंपनीचा हा नवीन फोन Dust, Water आणि Drop Proof आहे. Rugged SmartPhone या श्रेणीतील फोन्स असेच मजबूत असतात. (Motorola launches rugged smartphone Motorola Defy in a partnership with bullitt group)
Motorola Defy ची वैशिष्ट्ये
Motorola Defy चा Corning Gorilla Glass Victus ने प्रोटेक्ट केला गेला. या फोनची बॉडी मजबूत प्लॉस्टिकपासून बनवण्यात आली आहे. हा फोन IP68 सर्टिफाइड आहे, त्यामुळे हा पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहतो. तुम्ही हा फोन साबणाने किंवा इतर कोणत्याही द्रवाने साफ करू शकता, याला काही होणार नाही. हा फोन Dust, Water आणि Drop प्रूफ आहे, असा कंपनीने दावा केला आहे. म्हणजे धूळ, पाणी आणि उंचावरून पडल्यावर देखील हा फोन वापरता येईल.
Motorola Defy स्मार्टफोन -25°C च्या थंडीत आणि +55°C पर्यंतच्या गर्मीत देखील काम करू शकतो, असे कंपनीने सांगितले आहे. की गर्मी मध्ये पण काम करने की क्षमता रखता आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन 1.8 मीटर पर्यंतच्या उंचीवरून देखील सुरक्षित राहील. एवढ्या उंचीवरून पडून देखील या फोनला बाहेरून किंवा आतून कोणतेही नुकसान होणार नाही, असे Motorola चे म्हणणे आहे.
Motorola Defy चे स्पेसिफिकेशन्स
हा फोन 6.5 इंचाच्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेवर लाँच केला गेला आहे, हा डिस्प्ले एचडी+ रिजोल्यूशनसह येतो. फोनमध्ये अँड्रॉइड 11 आधारित मोटोरोलाचा यूएक्स इंटरफेस आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 662 चिपसेट देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात Motorola Defy 4 जीबी रॅमआणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे.
या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. समोर फोनच्या वॉटर ड्रॉप नॉचमध्ये 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा आहे. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. या फोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, हि बॅटरी 20वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. हा फोन €325 मध्ये लाँच केला गेला आहे, हि किंमत भारतीय चलनात 28,700 रुपयांच्या आसपास रूपांतरित होते.