Google Map वरून घर बसल्या करू शकता बक्कळ कमाई; जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 03:22 PM2022-02-22T15:22:05+5:302022-02-22T15:24:00+5:30

Google Map Business Verification : माध्यमांतील वृत्तांनुसार, आपण Google मॅपचा वापर करत असाल, तर आपल्याला सर्वप्रथम Google वर सूचीबद्ध असलेले असे बिझनेस शोधावे लागतील, जे अद्यापपर्यंत व्हेरिफाइड झालेले नाहीत. आपल्याला केवळ अनवेरिफाइड बिझनेस व्हेरिफाय करण्यासाठी मद करायची आहे.

Earn money from google maps know the whole process | Google Map वरून घर बसल्या करू शकता बक्कळ कमाई; जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस

Google Map वरून घर बसल्या करू शकता बक्कळ कमाई; जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस

Next

नवी दिल्ली - Google नकाशाचा वापार साधारणपणे योग्य पद्धतीने लोकेशन पाहण्यासाठी केला जातो. पण आता, गूगल मॅप्स कमाईचं एक मोठं साधन बनत आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? होय, जर आपल्याला Google Maps च्या माध्यमाने मोठी कमाई करायची असेल, तर आम्ही आपल्याला एक जबरदस्त सल्ला देणार आहोत. जो आपल्याला लोकेशनच्या माहिती बरोबरच कमाई करण्याची संधीही देईल. गुगलने एक नवी पॉलिसी लागू केले आहे, जी गुगल मॅप बिझनेस व्हेरिफिकेशन संदर्भात आहे. चला तर जाणून घेऊयात, घरबसल्या कसे कमवायचे पैसे...

Google Maps पासून कशी करायची कमाई - 
माध्यमांतील वृत्तांनुसार, आपण Google मॅपचा वापर करत असाल, तर आपल्याला सर्वप्रथम Google वर सूचीबद्ध असलेले असे बिझनेस शोधावे लागतील, जे अद्यापपर्यंत व्हेरिफाइड झालेले नाहीत. आपल्याला केवळ अनवेरिफाइड बिझनेस व्हेरिफाय करण्यासाठी मद करायची आहे. यासाठी आपल्याला संबंधित बिझनेसच्या ओनर्सना एक ईमेल पाठवावा लागेल. यात, आपल्याला संबंधित बिझनेस ओनरला, आपण आपला बिझनेस Google मॅप्सवर कशा पद्धतीने लिस्टेड करू शकता, हे समजावून सांगावे लागेल.

50 डॉलर्सपर्यंत कमावण्याची संधी - 
गुगलच्या नवीन धोरणानुसार, जर एखादा बिझनेस व्हेरिफाइड नसेल तर, तो यादीतून काढून टाकला जाईल. अशा प्रकारे, बिझनेस ओनरचीही मदत केली जाऊ शकेल. यातून आपल्याला सहजपणे 20 डॉलर ते 50 डॉलरपर्यंत (3700 रुपये) कमाई करता येईल.

Google Map Verified Business म्हणजे काय? -
सोप्या शब्दात सांगायचे तर, जेव्हा आपण Google Message उघडता तेव्हा आपल्याला खालच्या बाजूला अनेक पर्याय दिसतात. यांपैकी एक पर्याय बघण्यासाठीही उपलब्ध असतो. या पर्यायावर क्लिक करून आपण सहजपणे जवळ-पासच्या दुकानाचा पत्ता समजू शकता. याचा बिझनेससाठीही चांगला उपयोग होऊ शकतो.
 

Web Title: Earn money from google maps know the whole process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.