सावधान! मोबाईललाही बसतोय उन्हाचा चटका; तुमचा फोन तापत तर नाही ना?, 'अशी' घ्या काळजी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 05:11 PM2022-03-25T17:11:43+5:302022-03-25T17:21:19+5:30

वाढत्या तापमानाचा मोबाईलवर परिणाम होत असून, तो थंड व सुरक्षित ठेवण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.

Easy Ways to Keep Your Phone Safe in the Summer Heat | सावधान! मोबाईललाही बसतोय उन्हाचा चटका; तुमचा फोन तापत तर नाही ना?, 'अशी' घ्या काळजी 

सावधान! मोबाईललाही बसतोय उन्हाचा चटका; तुमचा फोन तापत तर नाही ना?, 'अशी' घ्या काळजी 

Next

सचिन काकडे

सातारा - ऊन वाढलं की शरीराला घाम येतो, थकवा येतो. अशा वेळी आपण आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेतो. मात्र, आपण वापरत असलेल्या मोबाईचं काय. अतीवापरामुळे मोबाईल तापण्याचे प्रमाण हल्ली वाढले असून, या मोबाईलला उन्हाचा चटका देखील सहन करावा लागत आहे. वाढत्या तापमानाचा मोबाईलवर परिणाम होत असून, तो थंड व सुरक्षित ठेवण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.

यामुळे तापतोय मोबाईल

मोबाईलमध्ये दिवसभर इंटरनेट सुरू ठेवणे, मोबाईलच्या बॅकग्राऊंडला अ‍ॅप्लीकेशन सुरू असणे, कोणत्याही चार्जरने मोबाईल चार्जिंग करणे, तासनतास  गेम खेळणे, फोनवर बोलणे, चार्जिंगला लावून मोबाईलचा वापर करणे, मोबाईलमध्ये अनावश्यक अ‍ॅप्लिकेशन्सचा भरणा आदी कारणांमुळे मोबाईल तापण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

ही काळजी घ्याच

- मोबाईलसाठी जाड कव्हर वापरू नये

- जाड कव्हरमुळे मोबाईलमधील उष्णता बाहेर पडत नाही

- मोबाईल जास्तवेळ चार्ज करू नका

- मोबाईलचा संपर्क उन्हाशी येणार नाही याची काळजी घ्या

- अनावश्यक अ‍ॅप्लीकेशन डिलीट करून टाका

- इंटरनेट वापरताना, बोलताना मोबाईल गरम झाला तर वापर थांबवा

- रात्रभर मोबाईल चार्ज कधीही करू नका. ओव्हर जार्चमुळे बॅटरी खराब होते

तर फोन बंद ठेवा

अती तापमानाचा बॅटरीवर परिणाम होतो. त्यामुळे मोबाईल टीव्ही, फ्रीज अथवा अन्य इलेक्ट्रीक वस्तूंजवळ ठेवू नका. उन्हामध्ये फोन गरम होतो. काम नसेल तर काही काळ फोन बंद ठेवा. त्यामुळे मोबाईलचे तापमान नियंत्रणात राहते.

मोबाईल चार्ज करताना त्याच कंपनीचा आणि ओरिजनल चार्जरचा वापर करणे गरजेचे आहे.. दुसऱ्या कंपनीचे चार्जर किंवा डुप्लिकेट चार्जरमुळे फोनच्या बॅटरीला हानी पोहोचू शकते. बॅकग्राऊंड अ‍ॅप्लिकेशन कायम बंद ठेवावे. अनावश्वक अ‍ॅप्लिकेशन डिलिट केले तर मोबाईलच्या प्रोसेसरवर ताण येत नाही. इतके केले तरी मोबाईलचे तापमान नियंत्रणात राहिल.

- संतोष शेडगे, सातारा

Web Title: Easy Ways to Keep Your Phone Safe in the Summer Heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.