स्मार्ट टीप: घरातील फ्रीजमध्ये करा 'हे' बदल अन् तुमचं वीजेचं बिल येईल थेट निम्म्यावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 01:37 PM2022-08-12T13:37:31+5:302022-08-12T13:40:22+5:30

वीज बिल निम्म्याहून अधिक कमी होईल. तुम्हाला फक्त फ्रीजमध्ये काही बदल करावे लागतील. टाटा पॉवरने आपल्या वेबसाईटवरही याबाबत माहिती दिली आहे. 

electricity bill may get half change these feature into refrigerator | स्मार्ट टीप: घरातील फ्रीजमध्ये करा 'हे' बदल अन् तुमचं वीजेचं बिल येईल थेट निम्म्यावर!

स्मार्ट टीप: घरातील फ्रीजमध्ये करा 'हे' बदल अन् तुमचं वीजेचं बिल येईल थेट निम्म्यावर!

googlenewsNext

नवी दिल्ली-

वीजबिलात वाढ झाल्यानं तुम्हीही प्रचंड त्राससेले असाल. वाढत्या वीज बिलामुळे घरातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरणंही आपण कमी करतो. आपण आज अशाच काही गोष्टींबद्दल माहिती घेणार आहोत ज्याच्या मदतीनं तुमचं वीज बिल थेट निम्म्यावर येऊ शकतं. अगदी वीज कंपन्या देखील याबाबतच्या टीप्स देत आहेत. 

टाटा पॉवरच्या अधिकृत वेबसाइटवर अनेक घरगुती वस्तूंची माहिती देण्यात आली आहे. अशीच एक सूचना घराच्या रेफ्रिजरेटरबाबत देण्यात आली आहे. जर तुम्ही हे बदल केले तर तुमच्या घराचे वीज बिल लक्षणीयरीत्या कमी होईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, तुम्ही रेफ्रिजरेटरचा दरवाजा सतत उघडू नये आणि थर्मोस्टॅटला मध्यम कूलिंग स्थितीवर सेट करुन टाका. तसंच, फ्रीज भिंतीला अगदी चिटकून ठेवू नका. फ्रीज आणि भिंतीत थोडी मोकळी जागा असायला हवी.

फ्रीजच्या क्षमतेपेक्षा जास्त त्यात सामग्री ठेवू नका. कारण यामुळेही वीजेचा जास्त वापर होतो. रेफ्रिजरेटर नेहमी भिंतीच्या पृष्ठभागाला खेटून ठेवू नये. थोडी मोकळी जागा असायला हवी जेणेकरुन हवेचा संचार सुलभ होतो. तुमचा रेफ्रिजरेटर आणि फ्रीजर खूप थंड ठेवू नये. त्यामुळे हवेचा प्रसार होण्यास त्रास होतो आणि विजेचा वापरही जास्त होतो. तसेच तुम्ही तुमच्या रेफ्रिजरेटरचा दरवाजा पूर्णपणे हवाबंद आहे याची देखील खात्री करावी. 

फ्रीजमध्ये अन्न आणि द्रव्य पदार्थ झाकून ठेवावेत. ज्यातून पदार्थाचा ओलावा निघून जाऊ शकेल अशा भांड्यांमध्ये पदार्थ ठेवणं महत्वाचं आहे. फ्रीजचा दरवाजा वारंवार उघडू नये. रेफ्रिजरेटरचे दार जास्त वेळ उघडे ठेवू नये. फ्रीजमधून थंड हवा बाहेर पडली की ती परत तयार होण्यास बराच वेळ लागतो आणि वीजेचा वापर वाढतो. गरम अन्न थेट फ्रीजमध्ये ठेवणं टाळा असं केल्याने वीज तर जास्त लागतेच शिवाय रेफ्रिजरेटरही खराब होतो.

Web Title: electricity bill may get half change these feature into refrigerator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.