सारखं दाबत बसायची गरज नाही! बॉटलमधून येणार धो धो पाणी; घर, ऑफिससाठी महत्वाचे यंत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 03:14 PM2022-04-11T15:14:57+5:302022-04-11T15:15:18+5:30
घर येणाऱ्या 20 लिटरच्या पाण्याच्या बॉटलमधून पाणी काढणं तसं कठीण असतं. यासाठी हजारो रुपयांचे डिस्पेन्सर बाजारात उपलब्ध आहेत. परंतु एक यंत्र हे काम काही शे रुपयांमध्ये करू शकतो.
दुकानात, कार्यालयात आणि काहींच्या घरी देखील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा 20 लिटरच्या बॉटलमधून केला जातो. या बॉटल्स एका डिस्पेन्सरवर उलट्या ठेवल्या जातात आणि बॉटल्समधून पाणी काढलं जातं. या डिस्पेन्सर्सचे नळ खूप त्रासदायक असतात. त्यामुळे जेव्हा तीव्र तहान लागलेली असते तेव्हाच हे नळ वारंवार ग्लास दाबून ठेवायला लावतात. परंतु बाजारात अशी अनेक यंत्र उपलब्ध आहेत जी हे काम सोपं करू शकतात.
आज आम्ही तुमच्यासाठी असं प्रोडक्ट घेऊन आलो आहोत, जे तुम्हाला बॉटलमधून पाणी काढण्यासाठी जास्त त्रास देणार नाही. अगदी सहज तुम्हाला हवं तितकं पाणी या डिवाइसमुळे मिळेल. तसेच तुम्हाला डिस्पेन्सरसाठी 7-9 हजार खर्च करण्याची देखील गरज नाही. हे काम फक्त काही शे रुपये देऊन करता येईल. हे यंत्र ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला बाजारात शोधाशोध करण्याची देखील गरज नाही.
इलेक्ट्रिक वॉटर डिस्पेन्सर
जर तुमच्या ऑफिस किंवा घरी बॉटलमधून पिण्याचं पाणी येत असेल तर हे प्रोडक्ट तुमच्यासाठी आहे. या डिवाइसच्या मदतीनं फक्त सिंगल टचमध्ये तुम्हाला हवं तितकं पाणी मिळेल. याच वेग इतका आहे की चुटकीसरशी तुमची बॉटल किंवा ग्लास पूर्ण भरेल. विशेष म्हणजे या डिवाइसमध्ये एक इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. ही मोटार बॅटरीवर चालते. जेव्हा तुम्हाला या डिस्पेन्सरचा वापर करून पाणी काढायचं असेल तेव्हा तुम्हाला फक्त टच करावा लागेल. त्यामुळे बॉटलमधील पाणी बाहेर येण्यास सुरुवात होईल.